प्रतिनिधी /सातारा
पोवई नाका – जिल्हा रूग्णालय – सदरबाझार हा रस्त्याचे काम पालिकेकडून केले जात नाही. जनतेच्या जीवाशी खेळ करणाऱया नगरपालिका पदाधिकारी व प्रशासनाच्या निषेधार्थ मुख्याधिकारी अभिजीत बापट यांना पुष्पगुच्छ देऊन अंदोलनाचा देण्यात आला असल्याची माहिती पत्रकाद्वारे सामाजिक कार्यकर्ते विकास धुमाळ यांनी दिर्लीं.
धुमाळ म्हणाले, गेली अनेक वर्षा पासून नगरपालिका पदाधिकारी, मुख्यधिकारी यांच्याकडे वेळो वेळी पाठपुरवा करूनही शहरातील अत्यंत महत्वाचा रहदारीचा रस्त्याच्या दयनीय अवस्थेकडे लक्ष द्यायला कोणाला वेळ नव्हता. त्या वेळी प्रशासनास जागे करण्यासाठी पोवई नाका, जिल्हा रूग्णालय सदरबाझार या रस्त्यावर खड्डे मोजा व खड्डे चुकवून वाहन चालवा ही निषेध स्पर्धा सदरबाझार नागरिकांच्यावतीने घेतली होती त्याची दखल घेऊन जिल्हाअधिकारी यांनी दि.22मार्च 21 ला प्रशासकीय मान्यता देऊन ही व मुख्यधिकारी यांनी लेखी पञ देऊनही नगरपालिका भ्रष्ट कारभारामुळे हे काम थांबवले व ठराविक ठेकेदारासाठी काम रखडवुन ठेवले. जनतेच्या जीवापेक्षा ठेकेदार जपणे म्हणजे नागरीकांच्या संयमाचा अंत पाहणे. या सर्वाचा निषेध म्हणुनच मुख्यधिकारी यांना निवेदन व पुष्पगुच्छ देऊन तिव्र निषेध व्यक्त केला. यावेळी मुख्यधिकारी यांनी पुष्प गुच्छ न घेता फक्त निवेदन स्विकारले व पंधरा दिवसात कामाला सुरवात करण्याचे अश्वासन दिले. जर 15 दिवसातही कामाला सुरूवात झाली नाही तर नगरपालिका प्रशासनाच्या निषेधार्थ तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा विकास धुमाळ यांनी दिला. या वेळी राहुल किर्दत, महेश देशमुख, राहुल इंगवले, महेश कदम उपस्थित होते.