आरोग्यदायी आणि पोषक आहाराचं प्रतिबिंब आपल्या चेहरावर पडत असतं. मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरही पोषक आहार घेत असते. मानुषी पृथ्वीराजमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. तंदुरूस्ती राखण्यासाठी मानुषी बरंच काही करते.
- मानुषी कधीही न्याहरी टाळत नाही. न्याहरीला ती ओट्स, विविध प्रकारच्या बिया तसंच फळं खाते. न्याहरी कधीही टाळू नये, असं ही अभिनेत्री सांगते.
- शरीराला पुरेसा ओलावा मिळणं आवश्यक असतं. यासाठी भरपूर पाणी प्यायला हवं. मानुषीच्या तरुण आणि तजेलदार त्वचेचं हेच रहस्य आहे. मानुषी दिवसभरात तीन ते चार लीटर पाणी पिते. उन्हाळ्यात भरपूर पाणी पिण्याचा सल्ला ती देते.
- मानुषी फारसं गोड खात नाही. अर्थात एखाद्या दिवशी गोड पदार्थ खायला तिला आवडतं. मात्र त्यातही ती पोषक पदार्थांची निवड करते. मैदायुक्त गोड पदार्थ टाळण्याचा सल्ला ती देते.
- मधल्या वेळच्या खाण्यासाठी मानुषी आरोग्यदायी पदार्थांची निवड करते. ती सुकामेवा खाते. चणे, शेंगदाणे, सोया मिल्कने भूक भागवते.
- मानुषी रात्री लवकर जेवते. आठ वाजेपर्यंत रात्रीचं जेवण घेण्यावर तिचा भर असतो. रात्री झोपण्याच्या किमान दोन तास आधी जेवायला हवं असं ती सांगते.