नवी दिल्ली
पेटीएम या वन 97 कम्युनिकेशन्स लिमिटेड यांच्या मालकीच्या कंपनीने विमा क्षेत्रातील रहेजा क्युबीई जनरल इन्शुरन्स कंपनी खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. ही खरेदी 568 कोटी रुपयांना होणार आहे. या अधिग्रहणानंतर येत्या 24 ते 36 महिन्यात पेटीएम कंपनी आपल्या विमा व्यवसायाचा विस्तार करणार आहे. स्वतःच्या उत्पादनांना कल्पकतेने सादर करत त्यांच्या विपणनावर कंपनी पुढील काळात भर देणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या खरेदी व्यवहारानंतर रहेजा जनरल इन्शुरन्स कंपनीच्या सध्याच्या कर्मचाऱयांवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी स्पष्ट केले आहे.