प्रतिनिधी / बेळगाव
येथील राज्य राखीव दलाचे कमांडंट हमजा हुसेन यांना राष्ट्रपती पदक मिळाले आहे. या पार्श्वभूमीवर त्यांचा हृद्य सत्कार करण्यात आला. डॉ. रवी पाटील व त्यांच्या सहकाऱयांनी हा सत्कार केला.
डॉ. रवी पाटील, वीरेश हिरेमठ, बसवराज रोट्टी, केंपान्ना कोच्चरगी आदींच्या उपस्थितीत हमजा हुसेन यांना पुष्पगुच्छ, शाल देऊन सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीला शुभेच्छा देण्यात आल्या.