साहित्य : 50 ग्रॅम रागी पीठ, 50 ग्रॅम गव्हाचे पीठ, 20 ग्रॅम ओट्स, 60 ग्रॅम गूळ पावडर, 80 ग्रॅम अनसॉल्टेड बटर, अर्धा चमचा बेकिंग पावडर, 2 चमचे दूध
कृती : प्रथम नॉनस्टिक पॅनमध्ये रागी पीठ मंद आचेवर दहा मिनिटे अथवा पीठ भाजल्याचा वास येईपर्यंत परतवून घ्यावे. आता भाजलेले पीठ एका ताटात काढून गार होण्यास ठेवावे. नंतर बाऊलमध्ये रागी पीठ घेऊन त्यात गव्हाचे पीठ, ओट्स, गूळ पावडर, अनसॉल्टेड बटर, बेकिंग पावडर आणि दोन चमचे दूध घालून मिश्रण चांगले एकजीव करून घ्यावे. आता त्याचा गोळा करुन एका प्लास्टिक कव्हरमध्ये गुंडाळून फ्रिजमध्ये अर्धा तास ठेवावे. आता ओव्हन 160 डिग्रीवर प्रिहीट करावे. प्लास्टिकमध्ये गुंडाळून ठेवलेला रागीपीठाचा गोळा काढून त्याचे छोटे छोटे कुकीज बनवावेत. बेकिंग ट्रे ला तुपाचा हात लावून त्यावर तयार कुकीज थोडे अंतर ठेवून ठेवाव्यात. ट्रे ओव्हनमध्ये 15 ते 18 मिनिटे ठेवून बेक करावे. आता ट्रे ओव्हनमधून काढून कुकीज पूर्णपणे गार होण्यास ठेवावे. नंतर खाण्यास द्यावे.
टीप : कुकीजमध्ये गूळ पावडर ऐवजी शुगर पावडर वापरू शकता.