बेळगाव : निलजी विभाग म. ए. युवा समिती व निलजी ग्रामस्थांच्यावतीने राजर्षि शाहू महाराज जयंती साजरी करण्यात आली. वृक्षारोपण करून अनोख्या पद्धतीने जयंती साजरी झाली. गावचे प्रतिष्ठित नागरिक गोपाळ पाटील, ता. पं. सदस्य सुनील अष्टेकर, युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके, सागर कोलकार यांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
शुभम शेळके यांनी शाहू महाराजांच्या कार्याचा आढावा घेतला. यावेळी भावकाण्णा मोदगेकर, नारायण पाटील, रवि निर्मळकर, राजू मुतकेकर, ग्रा. पं. सदस्य मधू मोदगेकर, रमेश मोदगेकर, भरत पाटील, बसवंत प्रभुजी, कृष्णा मोदगेकर, वसंत सुतार, किरण मोदगेकर, कपील पाटील, कल्लाप्पा मोदगेकर, शामराव पाटील, यल्लाप्पा पाटील, नारायण गोमाण्णाचे, पिराजी मोदगेकर, लखन मोदगेकर, भरत वर्पे, दत्तात्रय मोदगेकर, शिवराम देसाई, नारायण आक्षीमनी, विनोद पाटील, योगेश मोदगेकर, संतोष पाटील, श्रीकांत कदम, मनोहर हुंदरे, वासू सामजी, विनायक कावळे, आशीर्वाद सावंत, सिद्धार्थ चौगुले, अश्वजीत चौधरी, जोतिबा पाटील, सुनील पाटील यांच्यासह इतर उपस्थित होते.