नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यात बुधवारी भारतीय वायुसेनेचे फायटर विमान मिग-२१ बाइसन क्रॅश झाले आहे. सुदैवाने या दुर्घटनेत पायलट वाचला आहे. घटनेबाबत कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश देण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बाडमेर जिल्ह्याच्या ३५ किलोमीटर दूर मातासर गावात जवळपास संध्याकाळी ५ वाजताच्या सुमारास ट्रेनिंगसाठी निघालेले मिग-२१ हे विमान क्रॅश झाले. घटना घडताच उत्तरलाईहून वायु सेनेचे अधिकारी आणि आपल्या टीमसोबत हेलिकॉप्टरने घटनास्थळी दाखल झाले. विमान शेतात कोसळल्यानंतर त्याने पेट घेतला आणि शेताला देखील आग लागली. गावकऱ्यांनी वेळीच प्रसंगावधान दाखवून आगीवर पाणी टाकून आग विझवण्याचा प्रयत्न केला. यात विमानाच्या पायलट सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे.