जयपूर / वृत्तसंस्था
राजस्थानाच्या मोठय़ा भागात सध्या कडाक्याची थंडी पडत आहे. येत्या 24 तासांमध्ये राज्याच्या काही भागांमध्ये पाऊसही पडेल असे अनुमान पर्यावरण विभागाने व्यक्त पेले असल्याने प्रशासन त्या दृष्टीने तयारी करीत आहे. राज्यात न्यूनतम तापमान सिकर जिल्हय़ातील फतेपूर येथे 2.9 डिग्री सेल्शियस इतके होते. अनेक भागांमध्ये तापमान 5 डिग्री सेल्शियसच्या खाली पोहचले आहे. बिकानेर, जोधपूर आणि अजमेर जिल्हय़ांमध्ये थंडीचा जोर अधिक असून तेथेच पाऊस पडण्याचीही शक्यता आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.