ऑनलाईन टीम / मुंबई :
योगगुरू रामदेव बाबा यांनी कोरोनावर मात करण्यासाठी काढलेल्या कोरोनिल औषधावर राजस्थान पाठोपाठ आता महाराष्ट्रानेही बंदी घातली आहे. राज्याचे गृहमंत्री देशमुख यांनी यासंदर्भात ट्विट करत माहिती दिली.
अनिल देशमुख यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले की, कोरोनिलच्या क्लिनिकल रॉयल बाबत काही माहिती उपलब्ध नाही. जयपूरची एनआयएमएस संस्था याचा तपास घेत आहे. त्यामुळे अशा धोकादायक औषधाला महाराष्ट्र सरकार कधीही परवानगी देणार नाही. त्यामुळे महाराष्ट्रात या औषधावर बंदी घालण्यात येत आहे. तसेच त्यांनी यावेळी लोकांच्या आयुष्याशी खेळू नका, अशा आशयाचा हॅशटॅग ही वापरला आहे.
दरम्यान, हे औषध लॉन्च केल्यानंतर अवघ्या काही तासातच केंद्रीय आयुष्य मंत्रालयाने या या औषधाच्या जाहिराती बंद करण्याचे आदेश दिले होते. या औषधाची चाचणी पूर्ण होईपर्यंत जाहिरात थांबवण्यात यावी असे सांगितले होते.
राजस्थानने देखील या औषधावर बंदी घालताना म्हटले की, आयुष मंत्रालयाचीच जर परवानगी नसेल, कोणत्याही आयुर्वेदिक औषधाच्या विक्रीला परवानगी दिली जाणार नाही.