वार्ताहर /मडकई
जीवनातील प्रत्येक क्षणाचा आनंद कसा घ्यावा हे राजीव सुरेंद्र नाईक यांच्याकडून शिकावे. हसतमुख असे हे व्यक्तीमत्त्व सदैव कार्यमग्न असते. त्यांच्या या गुणांमुळेच नवदुर्गा हायस्कूलमध्ये ते शिक्षक व विद्यार्थी प्रिय कर्मचारी ठरले आहेत, असे उद्गार मुख्याध्यापक दिनेश नाईक यांनी काढले.
मडकई येथील नवदुर्गा हायस्कुलचे कर्मचारी राजीव नाईक यांच्या गौरव सोहळय़ात ते बोलत होते. यावेळी शिक्षिका रंजिता सिरसाट, शिवा नाईक, सुमित बानेकर, नितीन घैसास, विनोद नाईक, विद्देश च्यारी, अनिल प्रियोळकर, सुभाष नाईक, गोकुळ नाईक, रक्षा नाईक व विदिक्षा हे व्यासपीठवर उपस्थित होते.
रंजीता सिरसाट व नितीन घैसास यांनीही राजीव नाईक यांच्या कामाचे कौतुक केले. आपले मनोगत व्यक्त करताना राजीव नाईक म्हणाले, सात वर्षाच्या कामाची नोंद ज्या विद्यालयात घेतली जाते, ते विद्यालय आदर्श म्हणावे लागेल. राजीव नाईक हे विविध सामाजीक संस्थेशी निगडीत असून ते नाटय़कलाकारही आहेत. आहे.
भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन मुख्याध्यापक दिनेश नाईक यांच्याहस्ते त्यांचा गौरव करण्यात आला. स्वागत शिवा नाईक यांनी केले. सूत्रसंचालन सुमित बानेकर यानीं तर विद्देश चारी यांनी आभार व्यक्त केले.