प्रतिनिधी /पणजी
केंद्रीय साहित्य अकादमीच्या कोंकणी सल्लागार मंडळाचे निमंत्रक तसेच विद्या प्रबोधिनी वाणिज्य, शिक्षण, संगणक व व्यवस्थापन महाविद्यालय, पर्वरी, गोवा या संस्थेचे प्राचार्य डॉक्टर भूषण भावे यांनी आज गोव्याचे नवनियुक्त राज्यपाल डॉक्टर पी. एस. श्रीधरन पिल्ल? यांची सदिच्छा भेट घेतली त्यांच्यासमवेत गोवा राज्य सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष श्री. राजकुमार देसाई हेही उपस्थित होते.
श्री पिल्ले यांचे गोव्यात केंद्रीय साहित्य अकादेमीच्या वतीने स्वागत करून डॉ. भावे यांनी गोव्याच्या साहित्यकि, भाषिक स्थितीबद्दल तसेच कोरोनाच्या काळात आयोजित केल्या गेलेल्या कार्यक्रमांबद्दल त्यांना माहिती दिली
यावेळी डॉ. पिल्ले यांनी गोव्या संबंधी तसेच देशासंबंधी अनेक सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक तसेच साहित्यकि विषयांवर उभयतांशी चर्चा केली.
डा?. भावे यांनी त्यांना गोव्या संबंधी काही महत्त्वाची पुस्तके तसेच गोवा व केरळ यांचा समान दुवा असलेली काही पुस्तके भेट दिली राज्यपाल डॉ. पिल्ले यांनी आपला ’ओ मिझोराम’ हा काव्यसंग्रह डॉ.भावे यांना देऊन त्याचा कोंकणीमध्ये अनुवाद करण्याची परवानगी दिली.
गोमंतकाच्या क्रांती पर्वाला यंदा 75 वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या ’गोमंतकीय मुक्तिसंग्राम व साहित्य’ या विषयावरील दोन दिवसांच्या आगामी परिसंवादाबद्दलही डॉ. भावे यांनी माननीय राज्यपालांना माहिती दिली.