कोल्हापूर/प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल तथा शिवाजी विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांचे आज कोल्हापूर दोैऱ्यावर आहेत. मंगलवारी सकाळी १० .१५ वा . कोल्हापूर विमानतळावर आगमन झाले . यावेळी पालकमंत्री सतेज पाटील तर प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.
कोश्यारी हे कोल्हापूर येथे दि .४ ते ६ एप्रिल दरम्यान संपन्न होणाऱ्या पहिल्या विश्वात्मक संत साहित्य संमेलनाच्या उद्घाटनासाठी तसेच शिवाजी विद्यापीठाच्या ५८ व्या दीक्षांत समारंभात घोषित करण्यात आलेली राष्ट्रपती व कुलपती यांची सुवर्णपदके संबंधितांना राज्यपालांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत यासाठीही ते आले आहेत.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डी .टी. शिर्के, प्रभारी कुलसचिव डॉ . व्ही .एन . शिंदे, विमानतळ विकास प्राधिकरण संचालक कमल कटारिया आदी उपस्थित होते.