सोहम कुंभार तुळशी केसरीचा मानकरी, शिरोली दुमाला येथे राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा संपन्न
कसबा बीड /प्रतिनिधी
शिरोली दुमाला तालुका करवीर येथील राज्यस्तरीय मॅटवरील कुस्ती स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये तुळशी केसरीचा मानकरी सोहम कुंभार व आमदार केसरीचा कालीचरण सोनलकर हा मानकरी ठरला. या स्पर्धेसाठी 470 मल्लांचा समावेश होता. विविध गटात अनेक चटकदार कुस्त्या झाल्या. या कुस्ती यांनी प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फेडले.
विविध गटातून झालेल्या या कुस्ती मध्ये गट निहाय विजेते 30 किलो वजन गटासाठी प्रथम श्रेयस घोडके, द्वितीय शिवानंद मगदूम तर तृतीय आर्यन पाटील, 35 किलो वजन गटासाठी प्रथम प्रथमेश चौगुले , व्दितिय हर्षवर्धन माळी, 40 किलो साठी प्रथम करण पाटील, द्वितीय तीर्थ डकरे, तृतीय प्रतीक पाटील, 50 किलो साठी प्रथम अनिकेत कद्रेमुंनकर, द्वितीय स्वरूप जाधव, तृतीय रोहित येरुडकर, 55 किलो साठी प्रथम नरसिंग पाटील, द्वितीय मृणाल पाटील तृतीय दिग्विजय पाटील, 60 किलो साठी प्रथम सरदार पाटील, द्वितीय अनिकेत पाटील, तृतीय आर्यन पाटील, 66 किलो साठी प्रथम स्वरूप पाटील, द्वितीय सुरज अस्वले, तृतीय निलेश हिरुगडे या विजयी मल्लानी यश संपादन करून प्रॆक्षकांना उत्साहित केले.
या स्पर्धेचे मुख्य आयोजन म्हणजेच 45 किलो गटांमध्ये तुळशी केसरी यामध्ये सोहम कुंभार व प्रणव घारे या दोन मल्लामध्ये लढत झाली. ही कुस्ती अटीतटीची व आक्रमक कुस्ती होऊन गुणाद्वारे सोहम कुंभार विजय झाला. याबद्दल त्यास रोख 1500 रुपये चांदीची गदा व शिल्ड देऊन सन्मानित करण्यात आले.
तर ओपन गटामध्ये आमदार केसरी या स्पर्धेसाठी गंगावेस तालमीचा चे सोनबा लव्हटे,व कालीचरण सोनलकर यांच्यामध्ये लढत झाली. ही लढत सुरुवातीला दहा मिनिटे मैदानी निकाली कुस्ती पद्धतीने लावण्यात आली. यामध्ये दोन्ही पैलवानांनी एकमेकाच्या ताकतीचा अंदाज घेत सावध खेळ खेळला. एकेरी पट काढून कालीचरण सोनलकर यांनी सोनबा वर दोन गुण घेतले. त्या दोघांच्या मध्ये खडाखडी कुस्ती होऊन दोन्ही पैलवानानी आक्रमक पवित्रा घेतला होता. एकेरी पट व मोळी डाव याच्या साह्याने सोनलकर ही कुस्ती निकालात काढणार तेवढ्यात विश्रांतीसाठी विसल वाजवण्यात आली. विश्रांतीनंतर दोन्ही पैलवानांनी एकमेकाला गुणांच्या आधारे हरवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. टाचणी पडली तरी आवाज येईल, एवढी उत्सुकता या कुस्तीच्या वेळी शिगेला पोहोचली होती. शेवटी टाइम कंपाउंड या नियमानुसार कालीचरण यांनी 7 गुण घेऊन आमदार केसरीचा बहुमान मिळवला. याबद्दल कालीचरण सोनलकर यास रोख 20,000 रुपये चांदीची गदा व शिल्ड देऊन सन्मानित करण्यात आले.
बक्षीस वितरणाला प्रमुख पाहुणे आमदार पी एन पाटील, गोकुळ संघाचे अध्यक्ष विश्वासराव पाटील, संचालक बाळासाहेब खाडे व पदाधिकारी यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी संजय माळी, सरदार पाटील, आमदार पी एन पाटील यांची मनोगते झाली. अध्यक्षीय भाषणामध्ये राजश्री शाहू महाराज यांनी कुस्ती स्पर्धा तरुणांमध्ये चांगले शरीर व तरुणांनी स्पर्धेत भाग घ्यावा यासाठी चालू केली असल्याचे सांगितले. ग्रामीण भागात पैलवान तयार झाले पाहिजेत यासाठी क्रीडा संकुल हवे. कोरोना काळामध्ये कुस्ती थांबली होती आता नव्या जोमाने आमदार केसरी व तुळस केसरी च्या माध्यमातून कुस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी सरदार पाटील व नितीन पाटील या दोन्ही बंधूनी ही स्पर्धा घेतली, त्याबद्दल त्यांचे कौतुक केले. तसेच क्रीडा संकुल साठी निधी देण्याची ग्वाही दिली.
राष्ट्रीय तालीम संघाच्या वतीने निवेदक म्हणून राजाराम चौगुले यांनी गोकुळ केसरी ही स्पर्धा निवळली आहे ती लवकर चालू करावी असे सांगताच गोकुळ संघाचे चेअरमन विश्वास पाटील यांनी कोरोना परिस्थितीमुळे गोकुळ केसरी ही स्पर्धा थांबली आहे. शासन स्तरावरील नियम व परिस्थिती पाहून गोकुळ केसरी घेण्यात येईल असे सांगितले.