क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
बेंगळूर येथे राज्य कर्नाटक दिव्यांग स्पोर्ट्स संघटना व कर्नाटक राज्य टेबल टेनिस संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय पॅरा टेबल टेनिस स्पर्धेत बेळगावच्या जे. बी. स्पोर्ट्स फौंडेशनच्या टेबल टेनिसपटूंनी घवघवीत यश संपादन केले.
या स्पर्धेत महिलांच्या क्लास चार गटात ललिता गवस विजेत्या, आरती पवार उपविजेत्या, महिला क्लास 6-9 गटात मायक्वा सानिंगण्णवर विजेत्या तर सविता आजनकट्टी उपविजेत्या, पुरूष क्लास 3-4 गटात दिनेश सिद्धगवळी उपविजेते तर अप्पय्या कणवी व गिरीश सव्वाशेरी यांनी कांस्यपदक पटकाविले. पुरुष क्लास 9 ते 10 गटात फकिरप्पा यांनी कांस्यपदक पटकाविले.
या सर्व विजेत्या टेबल टेनिसपटूंना प्रशिक्षक संतोष जोशी व साहाय्यक प्रशिक्षक दिनेश बिराडे यांचे मार्गदर्शन लाभले.