बेंगळूर : राज्यात कोरोनामुक्त झालेल्या अनेक जणांना ब्लॅक फंगसची लागण झाली आहे. राज्यात आतापर्यंत 2,856 जणांना ब्लॅक फंगसची लागण झाल्याचे आढळून आले आहे. या फंगसमुळे 225 रुग्णांचा बळी गेला आहे. याबाबत माहिती देताना माहिती आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. के. सुधाकर म्हणाले, राज्यात आतापर्यंत ब्लॅक फंगस 2,856 रुग्ण आढळून आले असून 191 जण यातून बरे झाले आहेत. तर राज्यातील विविध रुग्णालयात उर्वरित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या रुग्णांवर जिल्हा इस्पितळांमध्ये मोफत उपचार केले जात आहेत. ब्लॅक फंगसने बेंगळुरात 72, गुलबर्गा जिल्हय़ात 22, मंगळूरमध्ये 18 रुग्णांसह राज्यातील विविध जिल्हय़ात 225 जणांचा मृत्यू झाला आहे.
Previous Article‘फ्रीडम’ रिफाईंड ऑईल आता 2 लिटर पॅकमध्ये उपलब्ध
Next Article कर्नाटकात शुक्रवारी ५,७८३ नवीन बाधितांची नोंद
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.