बेंगळूर/प्रतिनिधी
देशात कोरोना रुग्णांची संख्या कमी जास्त होत आहे. कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार प्रयत्न करत असून देशात तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण मोहीम सुरु झाली आहे.
कर्नाटकात मंगळवारी कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ झाली आहे. राज्यात कोरोनाने मंगळवारी पुन्हा ५०० चा टप्पा ओलांडला. राज्यात मंगळवारी ५९० कोरोना बाधितांच्या संख्येत भर पडली. तर राज्यातील विविध जिल्ह्यातून ३६६ रुग्ण कोरोनावर मात करत रुग्णायातून घरी परतले. तर ६ कोरोना संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान राज्यात सध्या एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ७,०३३ इतकी आहे. तर राज्यात आतापर्यंत १२,३७३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान राज्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या ९,५६,०४१ वर पोहोचली आहे. तर यापैकी ९,३६,६१६ रुग्ण कोरोनमुक्त झाले आहोत.
राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची सर्वाधिक संख्याही बेंगळूर शहरी जिल्ह्यात आहे. तसेच सध्या उपचारात असणारे सर्वाधिक रुग्णही बेंगळूरमध्येच आहेत. दरम्यान मंगळवारी जिल्ह्यात ३६३ कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली. तसेच जिल्ह्यात सध्या सक्रिय प्रकरणांची संख्या देखील ५,१८९ वर पोहोचली आहे. दरम्यान शहरी जिल्ह्यात कोरोना संक्रमणामुळे आतापर्यंत ४,५०७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.