37 रुग्णांचा मृत्यू : 603 जणांना डिस्चार्ज
प्रतिनिधी/ बेंगळूर
जीवघेण्या कोरोनाचा राज्यात कहर सुरूच असून रविवारी सुमारे 1925 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 1235 रुग्ण हे बेंगळूर शहरातील आहेत. दरम्यान मागील 24 तासात राज्यात 37 जणांचा बळी गेला आहे. त्यामध्ये बेंगळूरमधील 16 जणांचा तर बिदरमधील 9 जणांचा समावेश आहे. दिवसभरात 603 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
राज्यात आतापर्यंत 23,474 रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 9847 जण संसर्गमुक्त झाले आहेत. तर 13,251 जणांवर विविध इस्पितळांमध्ये उपचार सुरू आहेत. 243 जण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. तर राज्यातील मृतांचा एकूण आकडा 372 झाला आहे. 4 रुग्णांनी आत्महत्या केली आहे.
बेंगळूर शहर जिल्हय़ात 1235, मंगळूरमध्ये 147, बळ्ळारी 90, विजापूर 51, गुलबर्गा 49, उडुपी व धारवाडमध्ये प्रत्येकी 45, बिदरमध्ये 29, म्हैसूर 25, कोप्पळ 22, कारवार 21, चामराजनगर 19, हावेरी 15, हासन 14, चिक्कबळ्ळापूर, तुमकूर व कोलारमध्ये प्रत्येकी 13, बेळगाव व दावणगेरेत प्रत्येकी 11, रायचूर व मंडय़ामध्ये प्रत्येकी 10, चिक्कमंगळूर 9, शिमोगा 8, गदग 7, रामनगर 6, व बागलकोटमध्ये 4 तसेच चित्रदुर्गमध्ये 3 नवे रुग्ण आढळून आले आहेत.
राज्यात आतापर्यंत एकूण 7 लाख 6 हजार 425 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. यापैकी 6 लाख 65 हजार 525 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. रविवारी 16,899 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली असून यापैकी 14,649 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.