म्हैसूर/प्रतिनिधी
कर्नाटकात म्हैसूरमध्ये कोरोना प्रकरणातील मृत्यू दर (सीएफआर) जास्त असल्याने राज्य सरकारने जिल्ह्यात ‘डेथ ऑडिट’ करण्यासाठी तज्ज्ञ समिती पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.
आरोग्य व वैद्यकीय शिक्षणमंत्री के. सुधाकर यांनी ही घोषणा केली आहे. जास्त मृत्यू दरामागील कारणांची माहिती घेण्यासाठी तज्ज्ञ समिती जिल्ह्याची भेट घेईल. ते म्हणाले की, “त्यानंतर ते निराकरण करण्याचीही शिफारस करतील.” त्याचे विश्लेषण करण्यासाठी मोठ्या रुग्णालयात तज्ज्ञ समित्या गठित करता येतील असा प्रस्तावही मंत्र्यांनी मांडला आहे. मंगळवारी नोंदविण्यात आलेला राज्यातील मृत्यू दर सरासरी २.८८ टक्क्यांच्या तुलनेत म्हैसूरमध्ये ३.८५ टक्के जास्त मृत्यूची नोंद झाली आहे.
दरम्यान , म्हैसूर जिल्ह्यातील वाढणार मृत्यू दर कमी करण्यासाठी राज्य सरकारने पावले उचलली असून लवकरच डेथ ऑडिट करणारे तज्ज्ञांचे पथक म्हैसूरमध्ये दाखल होईल. यांनतर ते तेथील मृत्यू दराविषयी माहिती घेतील आणि उपाय सुचवतील.