येळ्ळूर येथील नवनिर्वाचित ग्रा.पं. सदस्य प्रमोद पाटील यांचा उपक्रम : जपली मराठी संस्कृती
प्रतिनिधी/ बेळगाव
नवीन वर्षाचे स्वागत तर जुन्या वर्षाला निरोप देताना पाटर्य़ांचे, सहलींचे तसेच इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मात्र नुकत्याच झालेल्या ग्राम पंचायतीच्या निवडणुकीमध्ये विजयी झालेल्या उमेदवाराने भजनी मंडळ आणून रात्रभर भजन करून नववर्षाचे स्वागत केले. यामुळे त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.
येळ्ळूर येथील वॉर्ड क्रमांक 12 मधून प्रमोद पुंडलिक पाटील हे विजयी झाले आहेत. 31 डिसेंबर रोजी त्यांनी भजनी मंडळाला घेऊन रात्रभर भजन करून नवीन वर्षाचे स्वागत केले. प्रमोद पाटील हे एक संयमी व्यक्तिमत्त्व आहे. गणपत गल्ली तसेच परिसरामध्ये प्रत्येक उपक्रमांमध्ये ते भाग घेतात. गणपत गल्लीतील गणेशोत्सव मंडळाने नेहमीच सामाजिक बांधिलकी जपली आहे. गणेशोत्सव काळात विविध धार्मिक कार्यक्रम करून त्यांनी मराठी संस्कृती जपली आहे.
कोणत्याही प्रकारचा धांगडधिंगांणा न घालता हिंदू संस्कृती जपली आहे. नवीन वर्षाचे स्वागत वेगळय़ा पद्धतीने करायचे असे ठरवून संपूर्ण गल्ली तसेच वॉर्डातील नागरिकांना एकत्र केले. भजनाचा कार्यक्रम आयोजित करून नववर्षाचे स्वागत केले. यामुळे त्यांचे कौतुक होत आहे.