ऑनलाईन टीम / मुंबई :
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज रात्री 9 वाजता 9 मिनिटांसाठी घरातील विजेचे दिवे बंद करून मेणबत्ती किंवा टॉर्च लावून दीपप्रज्वलन करण्याचे आवाहन देशवासियांना केले आहे. या वेळी केवळ घरातील विजेचे दिवेच 9 मिनिटांसाठी बंद करा. टीव्ही, पंखा, फ्रिज, कॉम्प्युटर्स यांसारखी उपकरणे सुरू ठेवा. घरातील अथवा बिल्डिंमधील संपूर्ण वीजपुरवठा बंद करू नका. तसेच हॉस्पिटलसह सर्व अत्यावश्यक सेवेच्या ठिकाणी दिवे बंद करू नका, असे आवाहन महापारेषणकडून करण्यात आले आहे.
एकाच वेळी घरांमधील विजेची मागणी कमी झाली तर नियंत्रण बिघडू शकते. त्यामुळे नॅशनल लोड डिस्पॅच सेंटरने ग्रीड नियंत्रणासाठी आवश्यक ती कार्यप्रणाली निश्चित केली आहे.