राधानगरी / प्रतिनिधी
राधानगरी ते फेजिवडे राज्य मार्गाच्या दुरावस्थेबाबत आज युवा प्रतिष्ठान राधानगरी, राधानगरी नगर वासीय पंचक्रोशीतील नागरिकांनी रास्ता रोको करत सुमारे दोन तास वाहतूक बंद केली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या लेखी आश्वासनानंतर हा रास्ता रोको मागे घेण्यात आला.
गेली दोन ते अडीच वर्षापासून या राज्य मार्गाच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. राधानगरी ते फेजिवडे हा रस्ता प्रलंबित राहिल्याने त्याचा नाहक त्रास राधानगरी नगरवासीयासह प्रवाशांना होत आहे. अनेक आंदोलने करूनही संबंधित ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यावरती प्रभावी उपाय योजना करत नसल्याने संतप्त युवा प्रतिष्ठान आणि राधानगरी नगरवासीयांनी आज सकाळी दहा वाजता रास्ता रोको केला. सुमारे दोन ते अडीच तासानंतर राधानगरी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अप्पासो कोळी यांच्या मध्यस्थीने 30 ऑक्टोंबर पूर्वी या रस्त्याचे डांबरीकरण करण्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता अमित पाटील आणि संबंधित ठेकेदार कंपनीच्या अधिकार्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर अखेर रास्ता रोको मागे घेण्यात आला. 01 नोव्हेंबर पर्यंत रस्ता झाला नाही, तर कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केलीय. रास्तारोको मुळे सुमारे दोन तास वाहतूक ठप्प झाली होती. राधानगरी पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
यावेळी कुलदीप पालकर,सरपंच फारुख नावळेकर , सुहास निंबाळकर,,डॉ, सुभाष इंगवले,बाळासो कळमकर ,राजेंद्र चव्हाण,उमेश शिंदे,दीपक शिरगावकर ,डी जी चौगले,महेश मोरये, जयसिंग पाटील, अतुल बावडेकर, यांच्यासह, राधानगरी, फेजिवडे,पडळी, शिरोली, गावचे ग्रामस्थांनी आंदोलनात सहभाग घेतला होता.