वृत्तसंस्था/ इकेनटेल
एटीपी टूरवरील येथे झालेल्या इकेनटेल खुल्या पुरूषांच्या चँलेजर्स टेनिस स्पर्धेत भारताचा टेनिसपटू रामकुमार रामनाथन याला एकेरीत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
चँलेजर्स सर्कीटमधील या स्पर्धेत झालेल्या एकेरीच्या अंतिम सामन्यात रविवारी अमेरिकेच्या सेबेस्टियन कोर्डाने बिगर मानांकित रामनाथनचा 6-4, 6-4 अशा सरळ सेट्समध्ये दीड तासांच्या कालावधीत पराभव करत अजिंक्यपद पटकाविले. रविवारी रामकुमार रामनाथनने आपला 26 वा वाढदिवस उपविजेतेपद मिळवून साजरा केला. 2020 च्या टेनिस हंगामात चँलेजर्स सर्कीटमध्ये रामकुमार रामनाथनने 60 गुणांची कमाई केली. या स्पर्धेत त्याला 7200 युरोसचे बक्षीस मिळाले.