बेळगाव : स्वामी विवेकानंद यांच्या बेळगाव भेटीला यावषी 128 वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त दि. 16 ते 22 ऑक्टोबर व दि. 27 ऑक्टोबर रोजी रामकृष्ण मिशन आश्रमतर्फे ऑनलाईन व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. दि. 16 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7.15 वा. सुली बेले चक्रवर्ती हे स्वामी विवेकानंदानी युवकांना दिलेला संदेश या विषयावर कानडीमध्ये बोलणार आहेत. दि. 17 रोजी स्वामी वेदातीनंदा हे ‘विवेकानंद आणि हरिपाद मित्रा’ हा विषय इंग्रजीमध्ये मांडणार आहेत. दि. 18 रोजी स्वामी महामेधनंदा हे ‘विवेकानंदांच्या दृष्टिकोनातून सक्षम कसे व्हावे’ या विषयावर तर दि. 18 रोजी स्वामी आत्मश्रद्धानंद हे ‘विवेकानंद आणि त्यांची भारतीय व्याख्याने’ या विषयावर बोलणार आहेत. दि. 20 रोजी स्वामी मंगलनाथनंदा हे ‘स्वामी विवेकानंदांचे अद्भूत जीवन’ या विषयावर कन्नडमध्ये व्याख्यान देतील. दि. 21 ऑक्टोबर रोजी स्वामी आर्यनंदा हे हिंदीमध्ये ‘नेतृत्व गुण व स्वामी विवेकानंद’ या विषयावर बोलतील. दि. 22 रोजी स्वामी युक्तेशानंद कानडी भाषेमध्ये ‘युग पुरुष’ हा विषय मांडतील. दि. 27 रोजी वेदांत सोसायटी न्यूयॉर्कचे प्रमुख स्वामी सर्वप्रियानंद हे ‘विवेकानंदांचे वास्तव वेदांत’ या विषयावर इंग्रजीमधून मार्गदर्शन करतील. आश्रमाच्या यू टय़ूब चॅनेलवर या व्याख्यानाचा लाभ घेता येईल.
Previous Articleनागरिकांकडून कोविड-19 ची मार्गदर्शकप्रणाली पायदळी
Next Article गरब्याचा ठेका नाही… दांडियाचा नाद नाही…
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.