बेळगाव : रामतीर्थनगर येथे दहावीनंतर शिक्षण घेणाऱया मुलींसाठी वसतिगृह बांधण्यात येणार आहे. या वसतिगृहाचे भूमिपूजन बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते करण्यात आले. रामतीर्थनगर येथील गणेश सर्कलजवळ 2 कोटी 63 लाख रुपयांच्या निधीतून इमारतीचे बांधकाम करण्यात येणार असल्याचे यावेळी बोलताना आमदार बेनके यांनी सांगितले. यावेळी मागासवर्गीय कल्याण विभागाच्या जिल्हाधिकारी ए. ज्योती, बेळगाव उत्तर विभागाचे भाजप पदाधिकारी इरय्या खोत, राजशेखर डोणी, विलास केरूर, गुरुदेव पाटील, हणमंत कोंगाली यासह इतर सदस्य उपस्थित होते.
Previous Articleधामणेत 16 पासून सामुदायिक पारायण सोहळा
Next Article आरपीडी महाविद्यालयात कार्यशाळा
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.