न्यायालयीन कर्मचाऱयासह विणकर नेत्याला बाधा : शहरवासीयांमध्ये भीतीचे वातावरण
वार्ताहर/ रामदुर्ग
रामदुर्ग शहरामध्ये बुधवारी दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे शहरवासीयांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. मंगळवारी तालुक्मयातील मनिहाळ-सुरेबान येथे एकाला कोरोनाची बाधा झाली होती. मात्र, बुधवारी शहरामध्येच दोन बाधित रुग्ण आढळून आल्याने तालुक्मयातील जनतेमध्ये भीती निर्माण झाली आहे.
शहर किल्ला भागामधील न्यायालयातील डी ग्रुप कर्मचारी (वय 59) व नेकारपेठाच्या विठ्ठल पेठेतील विणकर नेत्यांना (वय 73) कोरोनाची लागण झाली आहे. तहसीलदार, आरोग्य खात्याचे अधिकारी आणि पोलीस खात्याच्या सहकार्याने त्यांना बेळगाव येथे उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.
सदर न्यायालयीन कर्मचाऱयाचा मुलगा बेंगळूरहून घरी परतला आहे. मात्र, तो सुरक्षित असताना त्याच्या वडीलांना बाधा कशी झाली, याचा शोध घेण्यात येत आहे. या कर्मचाऱयाच्या प्राथमिक संपर्कात असणाऱया न्यायाधीशांना होम क्वारंटाईन करण्यात आले असून न्यायालय आवार सीलडाऊन करण्यात आले आहे. तसेच न्यायालयात कार्यरत 40 कर्मचाऱयांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
नेकारपेठमधील बाधित हा सुरेबान-मनिहाळ सोसायटीचा सदस्य असून विणकरांना 2 ते 5 हजार रुपये मदतनिधी देण्याच्या मागणीसाठी बेंगळूरला जाऊन आला आहे. बेंगळूरहून परतल्यानंतर त्याला ताप आल्याने खासगी दवाखान्यात उपचार घेतले. मात्र, उपचाराचा उपयोग न झाल्याने 4 जुलै रोजी सरकारी दवाखान्यातर्फे त्याचे स्वॅब बेळगावला तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. बुधवारी दुपारी त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने परिसरात भीती निर्माण झाली आहे. तसेच नेकारपेठमधील त्यांच्या निवासस्थानाभोवती सीलडाऊन करण्यात आले आहे.
दरम्यान, तहसीलदार गिरीश स्वादी, सीपीआय लखन मसगुप्पी, नगरपरिषदेचे आरोग्य निरीक्षक चंदन पाटील, तालुका वैद्याधिकारी निजगुली, आरोग्य खाते, नगरपरिषदेचे सफाई कर्मचाऱयांनी घटनास्थळी भेट देऊन परिसर सीलडाऊन केला.