बेंगळूर/प्रतिनिधी
अयोध्येत आज राम मंदिराचं भमिपूजन होणार आहे. यापार्शवभूमीवर बुधवारी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बेंगळूर शहर पोलिसांनी संपूर्ण शहरात सुरक्षा व्यवस्था वाढविली आहे.
बेंगळूर शहर पोलिस आयुक्त कमल पंत यांनी, शहरात सुरक्षेसाठी शहर पोलिसांची सुरक्षा व्यवस्था तैनात केली जाईल. तसेच कर्नाटकमधील कोडगु, मंगळूर, धारवाड आणि कलबुर्गी जिल्ह्यांनी सीआरपीसीच्या कलम १४४ नुसार आदेश जरी केला आहे. अशी माहिती त्यांनी दिली.
कर्नाटकचे गृहमंत्री बसवराज बोम्मई यांनी मंगळवारी गृह सुरक्षा विभाग आणि पोलिस अधिकाऱ्यांसमवेत राज्यातील सुरक्षा सज्जतेचा आढावा घेतला आहे.