रवि. दि. 21 ते 27 फेब्रुवारी 2021
मेष
या सप्ताहात वृषभेत मंगळ प्रवेश, सूर्य, हर्षल लाभयोग होत आहे. धंद्यात जम बसेल. जोरदार प्रयत्न करा. जुने येणे वसूल करा. नवीन ओळखींच्या मार्गाने तुमच्या कामातील अडचणी दूर करा. नोकरीत प्रगतीचा नवा टप्पा गाठता येईल. संसारात चांगली घटना घडेल. राजकीय, सामाजिक कार्यात अधिक वेगाने तुमचे डावपेच यशस्वी करा. पदाधिकार मिळवा. स्पर्धेत अव्वल रहाल. शिक्षणात मागे राहू नका. शेतकऱयांचे प्रश्न सुटतील.
वृषभ
या सप्ताहात वृषभेत मंगळ प्रवेश, सूर्य, चंद्र त्रिकोणयोग होत आहे. धंद्यात सुधारणा करा. नवे काम मिळवा. वसुली करा. नोकरीत तुमच्या कार्याचे कौतुक होईल. नवीन परिचय होतील. संसारात रेंगाळलेली कामे करा. वाद मिटवा. शुभ बातमी मिळेल. राजकीय, सामाजिक कार्यात नावलौकीक वाढेल. अधिकार मिळेल. शेतकरी वर्गाला चांगला निर्णय घेता येईल. कला, क्रीडा, शिक्षणात प्रगती करा.
मिथुन
या सप्ताहात वृषभेत मंगळ प्रवेश, सूर्य, हर्षल लाभयोग होत आहे. रविवार प्रवासात घाई करू नका. कायद्याचे पालन करा. धंद्यात नमते धोरण ठेवा. वाद वाढवू नका. प्रयत्नाने तुम्ही यश खेचा. नोकरीत काम वाढले तरी वरि÷ांच्याबरोबर नम्रपणे बोला. राजकीय, सामाजिक कार्यात बोलण्यात चूक करू नका. प्रसंगावधान ठेवा. स्पर्धेत जिद्द ठेवा. शिक्षणात मेहनत घ्या. घरात तणाव वाढवू नका.
कर्क
या सप्ताहात वृषभेत मंगळ प्रवेश, सूर्य, चंद्र षडाष्टक योग होत आहे. धंद्यात किरकोळ अडचणी येतील. अरेरावी न करता कामे करा. नोकरीत वरि÷ांना नाराज करू नका. जवळचे मित्र आग लावून समस्या वाढवू शकतात. संसारात वृद्ध व्यक्तीची काळजी घ्या. व्यसनाने प्रकृतीवर परिणाम होईल. राजकीय, सामाजिक कार्यात तुम्हाला माघार घ्यावी लागेल. स्पर्धा कठीण आहे. शिक्षणात आळस नको. जिद्द ठेवा.
सिंह
या सप्ताहात वृषभेत मंगळ प्रवेश, सूर्य, हर्षल लाभयोग होत आहे. इतरांच्या मदतीने धंद्यात तरुन जाता येईल. बोलण्यात चूक करू नका. हिशोब नीट करा. नोकरीतील कामे वेळच्यावेळी पूर्ण करा. गैरसमज वाढू देऊ नका. राजकीय, सामाजिक कार्यातील तणाव कमी होईल. तुम्हाला काही समस्या सोडवता येतील. घरातील प्रश्न सोडवाल. स्पर्धेत टिकून रहाल. शिक्षणात योग्य सल्ला मिळेल.
कन्या
या सप्ताहात वृषभेत मंगळ प्रवेश, सूर्य, चंद्र षडाष्टक योग होत आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला कामे करून घ्या. धंद्यात कठोर बोलू नका. बुद्धिचातुर्याने नोकरीतील समस्या सोडवा. मैत्रीत गैरसमज होईल. खाण्याची काळजी घ्या. राजकीय, सामाजिक कार्यात तुमचा अंदाज चुकेल. फसगत होईल. अरेरावी करण्याने प्रति÷ा धोक्मयात येईल. शिक्षणात एकाग्र व्हा. स्पर्धा कठीण वाटेल.
तुळ
या सप्ताहात वृषभेत मंगळ प्रवेश, सूर्य, हर्षल लाभयोग होत आहे. मनोबल टिकून ठेवता येईल. धंद्यात गोड बोला. रागाच्या भरात नुकसान होईल. प्रवासात सावध रहा. खाण्याचे तंत्र सांभाळा. रविवार तणाव होईल. नोकरीत वरि÷ांच्या मनाप्रमाणे कामे कराल. गुप्त कारवाया करणारे लोक ओळखून ठेवा. राजकीय, सामाजिक कार्यात बोलताना राग आवरा. कायदा पाळा. तुमची दिशाभूल करून घेऊ नका. शिक्षणात मागे राहू नका.
वृश्चिक
या सप्ताहात वृषभेत मंगळ प्रवेश, सुर्य, चंद्र त्रिकोणयोग होत आहे. धंद्यात काम वाढेल. फायदा होईल. भेटी घ्या. चर्चा करा. सप्ताहाच्या सुरुवातीला संसारात तणाव होईल. संयम ठेवा. प्रवासात घाई नको. नोकरीत काम वाढेल. वरि÷ हेकेखोरपणे वागतील. राजकीय, सामाजिक कार्यात तुमच्यावर आरोप येईल. नमते धोरण न घेतल्यास तणाव वाढेल. प्रकृतीची काळजी घ्या. स्पर्धेत टिकून रहाता येईल. शिक्षणात मेहनत घ्या.
धनु
या सप्ताहात वृषभेत मंगळ प्रवेश, चंद्र, शुक्र त्रिकोणयोग होत आहे. धंद्यात वाढ होईल. गुप्त कारस्थान करणारे लोक तुमच्या लक्षात येतील. वेळीच सर्व थांबवा. कुटुंबातील वाटाघाटीत लक्ष द्या. चांगली मदत मिळेल. नोकरीत तुमच्यावर वरि÷ खूष होतील. प्रगतीची नवी संधी मिळेल. राजकीय, सामाजिक कार्यात अडवणूक न करता तुम्ही तुमच्या कार्यात प्रगती करा. पुढे जाल. इतरांच्या सांगण्याचा विचार करा. निर्णय योग्य घ्या.
मकर
या सप्ताहात वृषभेत मंगळ प्रवेश. सूर्य, चंद्र त्रिकोणयोग होत आहे. धंद्यात वाढ होईल. चर्चा करताना अडचणी येतील. दूरदृष्टिकोन ठेवा. मन विचलीत होईल. प्रसंगावधान ठेवा. नवा मार्ग मिळेल. नोकरीत कामे वाढतील. नवीन ओळखी होतील. राजकीय, सामाजिक कार्यात तुमच्यावर दबाव राहिल. योग्य पद्धतीने विचार करा. तुमची प्रगती होईलच. स्पर्धा कठीण वाटेल. जिद्द ठेवा. शिक्षण सोडू नका.
कुंभ
या सप्ताहात वृषभेत मंगळ प्रवेश, सूर्य, हर्षल लाभयोग होत आहे. धंद्यात सावध रहा. किरकोळ अडचणीवर मात करा. रागाचा पारा वाढेल. प्रवासात घाई नको. कायद्याला धरूनच राजकीय, सामाजिक कार्यात संभाषण करा. तुमची प्रति÷ा वाढवणारी घटना एका बाजूला घडेल. गुप्त कारवायाही चालू राहतील. काही निर्णय तटस्थपणे घ्या. शिक्षणात मेहनत घ्या. व्यसन नको.
मीन
या सप्ताहात वृषभेत मंगळ प्रवेश, चंद्र, बुध प्रतियुती होत आहे. धंद्यात युक्तीने वागा मैत्रीत तणाव होईल. व्यसन करू नका. भावनेच्या आहारी न जाता निर्णय घ्या. नोकरी टिकवा. संसारात वादविवाद होईल. सहनशीलता ठेवावी लागेल. राजकीय, सामाजिक कार्यात तुमच्यावर आरोप येईल. पद टिकवा. लोकांना दुखवू नका. व्यवहारात फसगत टाळा. चांगली संगत ठेवा. शिक्षण सोडू नका.