रवि. 14 मार्च ते 20 मार्च 2021
मेष
या सप्ताहात मीन राशीत सूर्य, शुक्र प्रवेश करीत आहे. चंद्र, बुध लाभयोग होत आहे. धंद्यात नम्रपणे वागा. गिऱहाईक तोडू नका. संसारात क्षुल्लक नाराजी होईल. प्रकृतीकडे लक्ष द्या. नोकरीत कामाचा ताण वाढेल. मैत्रीत फसू नका. राजकीय, सामाजिक कार्यात तुमच्या प्रति÷sवर वार करण्याचा प्रयत्न होईल. संयमाने वागा. मोह टाळा. कला, क्रीडा, शिक्षणात मेहनत घ्या. जिद्द ठेवा.
वृषभ
या सप्ताहात मीनेत सूर्य, शुक्र प्रवेश करीत आहे. सूर्य, प्लुटो लाभयोग होत आहे. धंद्यात लाभ वाढेल. शेअर्समध्ये गुंतवणूक करता येईल. जुने येणे वसूल करा. मोठे काम मिळवा. कठीण कामे करून घ्या. नोकरीत तुमचे महत्त्व टिकून राहिल. नवे स्नेही मिळतील. संसारात आनंदी रहाल. राजकीय, सामाजिक कार्यात वेळेला महत्त्व द्या. योजना मार्गी लावा. कला, क्रीडा, शिक्षणात प्रगती होईल. कल्पनाशक्ती वाढेल.
मिथुन
या सप्ताहात मीन राशीत सूर्य, शुक्र प्रवेश करीत आहे. सप्ताहाच्या शेवटी रागावर ताबा ठेवा. कायदा पाळा. वाहनाचा वेग कमी ठेवा. धंद्यात वाढ होईल. ओळखीचा उपयोग होईल. जुने येणे वसूल करा. नोकरीत वरि÷ांचे मन जिंकता येईल. संसारातील तणाव कमी होईल. राजकीय, सामाजिक कार्यात तुमचे मुद्दे ग्राहय़ धरले जातील. मोठय़ा लोकांचा सहवास मिळेल. कला, क्रीडा, शिक्षणात प्रयत्नाने पुढे जाता येईल.
कर्क
या सप्ताहात मीनेत सूर्य, शुक्र प्रवेश करीत आहे. धंद्यात वाढ होईल. तणाव कमी होईल. ठरवाल ते करून दाखवता येईल. वसुली करा. नवे मित्र होतील. संसारातील तणाव, समस्या कमी होईल. उत्साहवर्धक वातावरण राहील. नोकरीत मन रमेल. कठीण कामे होतील. राजकीय, सामाजिक कार्यातील अडथळे दूर करता येतील. लोकसंग्रह वाढवा. कला, क्रीडा, शिक्षणात प्रगती करा.
सिंह
या सप्ताहात मीनेत सूर्य, शुक्र प्रवेश करीत आहे. चंद्र, बुध लाभयोग होत आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला मनावर दडपण येईल. प्रकृतीची काळजी घ्या. संसारात क्षुल्लक अडचणी येतील. नाराजी होईल. महत्त्वाच्या वस्तू नीट जागेवर ठेवा. नोकरीत कामाचा व्याप राहील. नम्रता ठेवा. राजकीय, सामाजिक कार्यात अडचणी येतील. विरोधक संधीसाधू धोरण ठेवतील. जवळचे लोक दूर जातील. व्यसन नको. स्पर्धा कठीण आहे. मेहनत घ्या.
कन्या
या सप्ताहात मीनेत सूर्य, शुक्र प्रवेश करीत आहे. सूर्य, चंद्र लाभयोग होत आहे. धंद्यात दिलासा मिळेल. नोकर माणसांना कमी लेखू नका. कठोर बोलणे टाळा. वसुलीचा प्रयत्न करा. नोकरीत इतरांना मदत करावी लागेल. व्यवहारात सावध रहा. राजकीय, सामाजिक कार्यात नाविन्य आणता येईल. उतावळेपणाने बोलू नका. प्रति÷ा मिळेल. संयम ठेवा. कला,क्रीडा, शिक्षणात महत्त्वाचे क्षण येतील. घरातील वातावरण निवळेल. उत्साह वाढेल.
तुळ
या सप्ताहात मीनेत सूर्य, शुक्र प्रवेश करीत आहे. चंद्र, बुध लाभयोग होत आहे. धंद्यात मेहनत घ्या. तणाव निर्माण होऊ देऊ नका. महत्त्वाच्या वस्तू सांभाळा. कायदा पाळा. भावनावश होऊ नका. मनातील विचार योग्य वेळीच व्यक्त करा. उतावळेपणा राजकीय, सामाजिक क्षेत्रात अडचणी निर्माण करेल. नवीन परिचय तपासून पहा. नोकरीत काम वाढेल. कला, क्रीडा, शिक्षणात आळस नको. वाहन हळू चालवा. दुखापत टाळा.
वृश्चिक
या सप्ताहात मीनेत सूर्य, शुक्र प्रवेश करीत आहे. धंद्यात दिलासा देणारी घटना घडेल. कठोर शब्द वापरू नका. चेष्टा करताना काळजी घ्या. मागील येणे वसूल करा. नोकरीत काम वाढले तरी प्रभाव टिकून राहील. नवी संधी मिळेल. संसारातील उणीव भरून काढा. राजकीय, सामाजिक कार्यात कलाटणी देणारी घटना घडेल. उत्साह वाढेल. लोकांची मदत मिळेल. कला, क्रीडा, शिक्षणात पुढे जाल.
धनु
या सप्ताहात मीनेत सूर्य, शुक्र प्रवेश करीत आहे. चंद्र, बुध लाभयोग होत आहे. धंद्यात क्षुल्लक गैरसमज होईल. कायदा पाळा. नम्रपणे वर्तन ठेवा. कामे होतील. नोकरीत कामात बदल झाल्याने मन अस्थिर होईल्. संसारात योग्य निर्णय घ्या. पोटाची काळजी घ्या. राजकीय, सामाजिक कार्यात भावना व कर्तव्य याचे नीट पालन करा. आळसाने नुकसान होईल. कला, क्रीडा क्षेत्रात जिद्द ठेवा. शिक्षणात मेहनत घ्या.
मकर
या सप्ताहात मीनेत सूर्य, शुक्र प्रवेश करीत आहे. चंद्र, शुक्र लाभयोग होत आहे. धंद्यातील कोणतीही समस्या रेंगाळत ठेऊ नका. संधी सोडू नका. धंद्यात जम बसवा. वसुली करा. नोकरीत गुणवत्ता दाखवता येईल. साडेसाती सुरू असली तरी प्रगती होईल. संधी सोडू नका. अविवाहितांना स्थळे मिळतील. घर खरेदी, विक्री करू शकाल. राजकीय, सामाजिक कार्याला वेग प्राप्त होईल. प्रति÷ा वाढेल. शिक्षणात प्रगती करा.
कुंभ
या सप्ताहात मीनेत सूर्य, शुक्र प्रवेश करीत आहे. शुक्र, नेपच्यून युती होत आहे. धंद्यात मार्ग मिळेल. अडचणी सोडवता येतील. जुने येणे वसूल करा. नोकरीत वरि÷ांच्या बरोबर मैत्री वाढेल. घरातील तणाव कमी होईल. समारंभात आप्ते÷ांच्या भेटी होतील. उत्साह वाढेल. राजकीय, सामाजिक कार्यात धोरण बदलता येईल. प्रभावी भाषण कराल. लोकसंग्रह वाढेल. कला, क्रीडा क्षेत्रात प्रेरणा मिळेल. शिक्षणात पुढे जा.
मीन
या सप्ताहात तुमच्याच राशीत सूर्य, शुक्र प्रवेश करीत आहे. प्रत्येक दिवस तुम्हाला आनंदाचा ठरेल. धंद्यात वाढ होईल. शब्द जपून वापरा. व्यवहारात घाई करू नका. नवीन कामे मिळवा. ओळखी वाढतील. नोकरीतील कठीण कामे मार्गी लावाल. राजकीय, सामाजिक कार्यात रेंगाळलेली कामे करा. वरि÷ांना खूष कराल. नवे पद मिळेल. कला, क्रीडा, साहित्यात चमकाल. शिक्षण सोडू नका.