रविवार दि.6 ते दि. शनिवार दि.12 जून 2021
मेष
या सप्ताहात चंद्र, गुरु लाभयोग, रवि, बुध युती होत आहे. महत्त्वाची कामे करून घेता येतील. तुमचा आत्मविश्वास वाढल्याने कोणतेही कठीण काम करण्यात यश येईल. धंद्यात जम बसेल. धंद्यात सुधारणा झाल्याने फायदा होईल. नोकरीत वरि÷ांची मर्जी राहील. राजकीय, सामाजिक कार्यात तुम्हाला नवा उत्साह मिळेल. अनेक चाहते तुमच्या पाठीशी असतील. संसारात शुभ समाचार मिळेल.
वृषभ
या सप्ताहात चंद्र, बुध युती, चंद्र, शुक्र लाभयोग होत आहे. धंद्यात फायदा होईल. शेअर्समध्ये चांगली गुंतवणूक करू शकाल. वसुली करा. नोकरीत तुमच्यावर मोठय़ा कामाची जबाबदारी वरि÷ देतील. योग्य सहकार्य मिळेल. राजकीय, सामाजिक कार्यात सप्ताहाच्या सुरुवातीला क्षुल्लक तणाव होईल. कायदा मोडू नका. जवळच्या लोकांमध्ये गैरसमज होईल, स्पर्धेत जिंकाल, घरातील कामे होतील.
मिथुन
या सप्ताहात चंद्र, गुरु लाभयोग, चंद्र नेपच्यून लाभयोग होत आहे. धंद्यात खर्च वाढेल. नोकरवर्ग धोका देईल. खर्च वाढेल. नोकरीमध्ये कोणतेही गैरकृत्य करू नका. राजकीय, सामाजिक कार्यात तुमच्यावर आरोप येईल. वरि÷ांच्या मनात संशय निर्माण करून दिला जाईल. संयमाने मत व्यक्त करा. समस्या कमी करता येईल. मोठेपणाच्या नादाने कोणतीही चूक करू नका.
कर्क
चंद्र, शनि त्रिकोण योग, सूर्य, बुध युती होत आहे. सप्ताहाच्या सुरुवातीपासून कठीण कामे करून घ्या. प्रवासात घाई करू नका. राग आवरा. धंद्यात फायदा होईल. जास्त मोह ठेवू नका. नोकरीत विरुद्धलिंगी व्यक्तीकडून मनस्ताप होईल. राजकीय, सामाजिक कार्यात तुमचे महत्त्व टिकवून ठेवता येईल. लोकांच्या मनात स्थान निर्माण करा. घरात क्षुल्लक वाद होईल. व्यसन टाळा.
सिंह
या सप्ताहात चंद्र, गुरु लाभयोग, सूर्य, बुध युती होत आहे. धंद्यात नवे काम मिळवा. जुने येणे वसूल करा. वाद मिटवा. नोकरीत प्रभाव राहील. संसारात शुभ समाचार मिळेल. राजकीय, सामाजिक कार्यात तुमच्या कामाचे सर्वत्र कौतुक होईल. मान-सन्मान मिळेल. कार्याचा नवीन विस्तार करू शकाल. स्पर्धेत प्रगती होईल. कला, क्रीडा, साहित्यात चमकाल.
कन्या
या सप्ताहात चंद्र, शुक्र लाभयोग, सूर्य, बुध युती होत आहे. धंद्यात नवे काम मिळवा. मागील थकबाकी वसूल करा. रविवार, सोमवार संयम ठेवा. व्यसनात धुंद होऊ नका. नोकरीत कामावर लक्ष द्या. राजकीय, सामाजिक कार्यात वाढ होईल. जनहिताची योजना बनवा. कठीण कामे करून घ्या. कायदा पाळा. संसारात आनंदी रहा.
तुळ
या सप्ताहात चंद्र, मंगळ लाभयोग, चंद, गुरु त्रिकोण योग होत आहे. धंद्यात हिशोब नीट करा. वाद वाढवू नका. अहंकाराने कोठेही वागू नका. कायदा पाळा. नोकरीत वरि÷ांचा दबाव राहील. शब्द जपून वापरा. संसारात कामे वाढतील. अंदाज चुकेल. राजकीय, सामाजिक कार्यात टीकात्मक ताशेरे ओढले जातील. तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न होईल. सावध रहा.
वृश्चिक
या सप्ताहात चंद, मंगळ लाभयोग, सूर्य, बुध युती होत आहे. संमिश्र वातावरण प्रत्येक क्षेत्रात राहील. धंद्यात गोड बोला. वस्तू नीट सांभाळा. नवीन ओळख फसवी ठरू शकते. नोकरी प्रभाव टिकवा. राजकीय, सामाजिक कार्यात टीका होईल. जवळचे लोक विरोधात जातील. खाण्याची काळजी घ्या. अनाठायी पैसा खर्च होऊ शकतो. संसारात तणाव वाढवू नका.
धनु
या सप्ताहात चंद्र, शुक्र लाभयोग, चंद्र, गुरु त्रिकोण योग होत आहे. धंद्यात नोकरवर्गाशी वाद होईल. दगदग वाढेल. प्रवासात घाई करू नका. गोड बोलून कार्यभाग साधा. नोकरी टिकवा. राजकीय, सामाजिक कार्यात तुम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न होईल. कामाचा व्याप वाढेल. घरातील वृद्ध व्यक्तीची काळजी वाटेल. स्पर्धा कठीण आहे.
मकर
या सप्ताहात चंद्र, गुरु लाभयोग, सूर्य, बुध युती होत आहे. धंद्यात कामे येतील. जास्त मोह ठेवू नका. भागिदाराच्याबरोबर सलोख्याने वागा. चर्चा करा. व्यसनाने नुकसान होईल. संसारात विचारात मतभेद होतील. राजकीय, सामाजिक कार्यात सहकारी वर्गाला, नेत्यांना कमी लेखू नका. सर्वांच्या मताला प्राधान्य द्या. स्पर्धा जिंका.
कुंभ
या सप्ताहात चंद, शुक्र लाभयोग, चंद्र, हर्षल युती होत आहे. धंद्यात काम मिळाले तरी पूर्ण करण्यात अडचण येईल. नोकरवर्ग दगा देतील. संयमी भूमिका घ्या. वसुली करा. नोकरी टिकवा. कामाचा व्याप वाढेल. राजकीय, सामाजिक कार्यात तुमच्या स्पष्ट बोलण्यातून तणाव निर्माण केला जाईल. कायद्याला धरून बोला. मैत्री वाढेल.
मीन
या सप्ताहात चंद्र, शुक्र लाभयोग, सूर्य, बुध युती होत आहे. धंद्यात फायदा होईल. नवे काम मिळवा. वसुली करा. नोकरीत कायद्याच्या बंधनात राहून महत्त्वाचा निर्णय घ्या. राजकीय, सामाजिक कार्यात लोकसंग्रह वाढवा. समाजकार्यात राजकारण करण्याचा प्रयत्न करणाऱयाला ओळखून ठेवा. स्पर्धेत प्रगती कराल. संसारात आनंदी रहा. पोटाची काळजी घ्या.