रविवार दि.20 जून ते शनिवार दि.26 जून 2021
मेष
या सप्ताहात कर्केत शुक्रप्रवेश, सूर्य, गुरु त्रिकोणयोग होत आहे. धंद्यात खर्च, तणाव वाढेल. रागाचा पारा वाढेल. प्रवासात सावध रहा. तरीही तुमच्या जिद्दीने तुम्ही धंद्यात पुढे जाल. सप्ताहाच्या मध्यावर प्रकृतीची काळजी घ्या. नोकरीतील कामे करून घ्या. राजकीय, सामाजिक कार्यात विरोधक किरकोळ अडचणी आणतील. टीका करतील. प्रति÷ा वाचवता येईल. स्पर्धेत प्रगती होईल.
वृषभ
या सप्ताहात कर्केत शुक्रप्रवेश, सूर्य, चंद्र त्रिकोणयोग होत आहे. धंद्यात काम मिळेल. फायदा होईल. परंतु तुमच्या प्रगतीवर जळफळणारे लोक अडचणी निर्माण करतील. नोकरीत कामाचा ताण वाढेल. संसारात धावपळ होईल. राजकीय, सामाजिक कार्यात तुमच्याशी स्पर्धा करणारे लोक तुमच्या चुका दाखवतील. कायद्याच्या चौकटीत राहून बोला.
मिथुन
या सप्ताहात कर्केत शुक्रप्रवेश, सूर्य, गुरु त्रिकोणयोग होत आहे. धंद्यात नोकरांना टिकवून ठेवा. नवे काम मिळेल. शेअर्समध्ये फायदा होईल. नोकरीत तुमच्या कामाचे कौतुक होईल. प्रगतीची संधी मिळेल. राजकीय, सामाजिक कार्यात महत्त्वाच्या कामावर लक्ष द्या. योजना पूर्ण करा. लोकप्रियता वाढेल. कायदा मात्र मोडू नका. कठोर शब्द टाळा.
कर्क
तुमच्याच राशीत शुक्रप्रवेश, चंद्र, बुध प्रतियुती होत आहे. धंद्यात तडजोडीचे धोरण ठेवा. प्रकरण हातघाईवर येईल, असे भांडण करू नका. नोकरीत कामाचा ताण वाढेल. अरेरावी करू नका. संसारात वृद्ध व्यक्तीची चिंता वाटेल. प्रेमाच्या व्यक्ती मदत करतील. राजकीय, सामाजिक कार्यात कोणताही चुकीचा निर्णय घेतला जाऊ नये, याकडे लक्ष द्या. प्रति÷ा सांभाळा.
सिंह
या सप्ताहात कर्केत शुक्रप्रवेश, सूर्य, गुरु त्रिकोणयोग होत आहे. धंद्यात क्षुल्लक तणाव होईल. गिऱहाईकाला नाराज करू नका. सौम्य शब्दात बोला. नोकरीत वरि÷ांना मदत करावी लागेल. संसारात घरातील व्यक्तींची मर्जी पाहून बोला. खाण्याचे तंत्र सांभाळा. राजकीय, सामाजिक कार्यात महत्त्वाच्या प्रश्नाला मागे ठेवू नका. योग्य सल्ला मिळवता येईल. स्पर्धा जिंकाल.
कन्या
या सप्ताहात कर्केत शुक्रप्रवेश, चंद्र, बुध प्रतियुती होत आहे. धंद्यातील अडचणी कमी होतील. वसुली करा. नवे काम मिळवा. घरासंबंधी समस्येवर उपाय शोधता येईल. नोकरीत खूष कराल. राजकीय, सामाजिक कार्याला चांगला प्रतिसाद मिळेल. उत्साह वाढेल. प्रकृतीत सुधारणा जाणवेल. नवीन ओळखी होतील. स्पर्धेत पुढे जाल.
तुळ
या सप्ताहात कर्केत मंगळप्रवेश, सूर्य, गुरु त्रिकोणयोग होत आहे. धंद्यात नवी संधी मिळेल. चर्चा करताना कायद्याचे बंधन लक्षात ठेवा. कठोर शब्द वापरू नका. फायदा करून घेता येईल. नोकरी मिळेल. वरि÷ांना खूष कराल. संसारात आनंदाची बातमी मिळेल. राजकीय, सामाजिक कार्यात तुमचा प्रभाव वाढेल. लोकसंग्रह वाढेल. स्पर्धा जिंकाल.
वृश्चिक
या सप्ताहात कर्केत शुक्रप्रवेश, सूर्य, चंद्र षडाष्टक योग होत आहे. धंद्यात काम वाढेल. फायदा होईल. मोठय़ा लोकांच्या मदतीचा उपयोग करून घेता येणार नाही. नोकरीत वरि÷ांना कमी समजू नका. संसारात प्रेमाने वागा. कामे होतील. अरेरावीने कुठेही वागू नका. राजकीय, सामाजिक कार्यात तुमचा पाणउतारा करण्याचा प्रयत्न होईल. खंबीरपणा टिकून ठेवता येईल.
धनु
या सप्ताहात कर्केत शुक्रप्रवेश, सूर्य, चंद्र त्रिकोणयोग होत आहे. किरकोळ कारणाने तणाव होईल. मन अस्थिर होईल. गाण्याचे तंत्र सांभाळा. महत्त्वाच्या वस्तू नीट ठेवा. धंद्यात यांत्रिक बिघाड होण्याचा संभव आहे. नोकरीत इतरांना मदत करण्याने तुम्ही थकून जाल. राजकीय, सामाजिक कार्यात तुमची प्रति÷ा राहील. विरोधकांना कमी समजू नका.
मकर
या सप्ताहात कर्केत शुक्रप्रवेश, सूर्य, चंद्र षडाष्टकयोग होत आहे. धंद्यातील समस्या थोडी कमी होईल. अहंकाराची भाषा कुठेही उपयुक्त ठरणार नाही. नोकरीत तुमच्यावर आरोप येईल. कामात चूक होईल. लक्ष द्या. राजकीय, सामाजिक कार्यात वरि÷ांच्याबरोबर वाद वाढेल. संसारात खर्च वाढेल. काळजी वाटेल. स्पर्धा करू नका.
कुंभ
या सप्ताहात कर्केत शुक्रप्रवेश, सूर्य, गुरु त्रिकोणयोग होत आहे. धंद्यात तणाव होईल. खर्च वाढेल. भागिदार अडचणी निर्माण करेल. चर्चा वादग्रस्त ठरू शकते. नोकरीत तुमच्या कामाचा प्रभाव पडेल. जवळचे लोक जळफळतील. व्यसन करू नका. पेमात तणाव होईल. खाण्याचे तंत्र सांभाळा. राजकीय, सामाजिक कार्यात प्रति÷ा टिकवतांना अनेक प्रश्न कठीण वाटतील.
मीन
या सप्ताहात कर्केत शुक्रप्रवेश, चंद्र, बुध प्रतियुती होत आहे. धंद्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न करा. मिळते, जुळते धोरण सर्व ठिकाणी उपयुक्त पडेल. नोकरीत बडेजाव न करता इतरांना मदत करा. लाभापाई कुठेही फसू नका. राजकीय, सामाजिक कार्यात स्वतःच्या हिताकडे लक्ष द्या. स्वतःची कामात चूक होऊ देऊ नका. पोटाची काळजी घ्या.