दि. 1-1-2023 ते 7.1.23 पर्यंत
मेष
नवीन वर्षाची सुरुवात गूळ खाऊन करावी. गेल्या काही दिवसांपासून घरात आणि कामाच्या ठिकाणी असलेला विसंवाद निवळू लागेल. या आठवडय़ात काही वेळ तुम्हाला तणावमुक्त रहावे असे वाटेल. एखाद्या सुट्टीची किंवा एखाद्या ब्रेकची गरज आहे हेही तुम्हाला जाणवेल. आर्थिक आवक थोडी कमी असली तरी समाधानाचे क्षण मिळतील.
अंघोळीच्या पाण्यात कडुलिंबाची पाने घालावीत
वृषभ
वर्षाच्या पहिल्या आठवडय़ात आनंदी बातमी कळेल. या आठवडय़ात तब्येतीला सांभाळावे लागेल. आर्थिक देवाणघेवाणीच्या बाबतीमध्ये समोरची व्यक्ती तुमचा फायदा उचलू शकते. या आठवडय़ात भावनांवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. कोणावरही आंधळा विश्वास घातक ठरू शकतो.
पिंपळाचे न फाटलेले पान जवळ ठेवावे
मिथुन
पहिल्या आठवडय़ात ताण येणार नाही याची काळजी घ्यावी. परिवारासोबत वेळ घालवल्यामुळे मन आनंदी असेल. जवळच्या एखाद्या ठिकाणाला भेट द्याल. धार्मिक कार्यात रस घ्याल. जुनी एखादी चिंता तुम्हाला सतावू शकते. परिवारातील व्यक्तींची मने सांभाळावी लागतील. जास्त दमछाक होऊ देऊ नका.
लहान मुलीला हिरवे वस्त्र दान करावे
कर्क
वर्षाची सुरुवात सुंदर असणार आहे. या आठवडय़ात तुमचा कल थोडासा अध्यात्माकडे झुकलेला असेल. याचे कारण कदाचित एखाद्या जवळच्या व्यक्तीशी आलेला दुरावा असू शकते. या आठवडय़ात तुम्ही स्वमग्न असाल. आर्थिक बाबतीमध्ये येणे कमी आणि देणे जास्त अशी परिस्थिती होऊ शकते.
कष्टकऱयांना दूध दान करावे
सिंह
नववर्षाच्या सुरुवातीला नवे मित्र होतील. कामाच्या ठिकाणी तुम्ही दाखवलेला उत्साह आणि केलेले नियोजन याचे वरिष्ठाकडून कौतुक होऊ शकते. व्यवसायाच्या माध्यमातून नवीन ओळखी होतील. वैवाहिक जीवनामध्ये निर्माण झालेला तणाव कमी होऊ लागेल. मौल्यवान वस्तू खरेदी करण्याचा मानस असेल.
लाजाळूची पाने जवळ ठेवावी
कन्या
नववषी नवे संकल्प सिद्ध होतील, पण तुम्ही विचार केलेल्या कामाचा किंवा कल्पनेचा फायदा तिसराच कोणीतरी उचलण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आपल्या योजना गुप्त ठेवाव्या. परिवारातील ज्येष्ठ व्यक्तीच्या तब्येतीची काळजी वाटू शकते. वैवाहिक जीवन सुखमय असेल. प्रेमींनी लांब फिरायला जाणे टाळावे.
मुंग्यांना साखर घालावी
तूळ
वर्षाची सुरुवात दही साखर खाऊन करावी. सामाजिक कार्यामध्ये भाग घेण्याची संधी मिळेल. या आठवडय़ात तुमचा स्वभाव धार्मिकतेकडे झुकलेला असेल. शक्मयतो आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा. दुसऱयांच्या कोणत्याही बाबतीमध्ये हस्तक्षेप करू नका. तब्येतीला जपण्याचा काळ आहे. या आठवडय़ात पारिवारिक संतुष्टी अनुभवाला येईल.
नारळाच्या झाडाला पाणी घालावे
वृश्चिक
वर्षाच्या सुरुवातीला नात्यांमध्ये बहर येईल पण कामांमध्ये चुका होणार नाहीत याची काळजी घ्यावी लागेल. तब्येतीच्या लहानसहान तक्रारी संभवतात. अकारण मन उदास होऊ शकते. एखाद्या व्यक्तीवरील अतिविश्वास धोकादायक ठरू शकतो. अनावश्यक वस्तुंवर ती खर्च होण्याची शक्मयता आहे. परिवारातील सामंजस्य वाढेल.
तहानलेल्या पशुंसाठी पाण्याची सोय करावी
धनु
नववर्षामध्ये नवीन कला शिकावी. नवीन कामाकरता अर्ज करू शकाल. नवीन प्रकल्प हातात घ्याल. काही गोष्टींमध्ये लोकांची मदत घ्यावी लागू शकते. कोणत्याही कारणाने दुसऱयांवर काम टाकणे टाळा. तुमच्या आतला आवाज ऐका. तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळेल. परिवारातील वातावरणाला सुखमय कराल. प्रेमींना उपहार मिळू शकतो.
जलचरांना कणकेचे खाणे घाला
मकर
वर्षाची सुरुवात पेढा खाऊन करावी. वृद्ध व्यक्तीमुळे मानसिक चिंता वाढू शकते. सहकाऱयांबरोबर वर्तणूक चांगली ठेवा. निंदानालस्ती करणे टाळावे. एखाद्या स्त्रीमुळे फायदा होण्याची शक्मयता आहे. पाण्याच्या ठिकाणी प्रवास करण्याचा योग संभवतो. या आठवडय़ात मित्रांसोबत किंवा नातेवाईकांसोबत वेळ घालवाल.
केळीच्या झाडाजवळील माती जवळ ठेवावी
कुंभ
वर्षाची सुरुवात तब्येतीला कसे सुधारता येईल या विचाराने करावी. कर्तृत्वाला वाव आणि धडाडीला संधी मिळेल. हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. कित्येक संधी तुमच्या समोर उभ्या राहतील, पण त्यातल्या योग्य संधींचे निवड करणे महत्त्वाचे ठरेल. शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक स्वास्थ्यही महत्त्वाचे आहे. चिडचिड केल्याने तब्येतीवर परिणाम होऊ शकतो.
सुलेमानी हकीक जवळ ठेवावा
मीन
नवीन वषी नवीन नाते जोडण्याचा प्रयत्न करावा. तुमच्या आजूबाजूच्या लोकांमध्ये विश्वास ठेवता येण्यासारखे कितीजण आहेत याचा साक्षात्कार करून देणारा हा आठवडा असेल. आयत्या वेळी कोण कामाला येतो हे तुम्हाला कळेल. घरातील एखाद्या व्यक्तीच्या तब्येतीची काळजी वाटू शकते. पैशांच्याबाबतीत निष्काळजीपणा करू नका. प्रेमीजनांनी पुढचा विचार करावा.
लाल रंगाचा हातरुमाल जवळ ठेवावा.
टॅरो उपाय ः नवीन वर्ष सुंदर जावे, आर्थिक बाजू भक्कम असावी म्हणून हा उपाय देत आहे. आपण पैशाचे पाकीट किंवा पर्स वापरतो. याचा रंग काळा कधीही नसावा. हे चिन्ह हिरव्या मार्करने पाकिटावर काढावs.