सर्वपित्री अमावास्या- पितरांचे स्मरण, पूजन अवश्य करा
बुध. दि. 29 ते मंगळवार दि. 5 ऑक्टोबर
पुढील बुधवारी 6 ऑक्टोबरला सर्वपित्री अमावास्या आहे. नियतीने कोणावरही अन्याय केलेला नाही. प्रत्येकाला त्याचे त्याचे दिवस ठरवून दिलेले आहेत. त्यानुसार भाद्रपद पौर्णिमेपासून अमावास्येपर्यंत हा पूर्वजांचा काळ समजला जातो. या महिन्यात पितरांचे स्मरण, पूजन, श्राद्ध केल्यास त्यांचे आशीर्वाद लाभून पुढील जीवन सुखाचे होते. हल्लीच्या या काळात श्राद्धकर्म, पुनर्जन्म, देवधर्म यावरील लोकांचा विश्वास कमी होत चाललेला आहे. याला बरीच कारणे असतील. पूर्वजन्मात अथवा या जन्मात आपल्या हातून ज्या काही बऱया-वाईट गोष्टी घडलेल्या असतात त्याचे परिणाम या ना त्या स्वरूपात या जन्मी अथवा पुढील जन्मी निश्चितच भोगावे लागतात. पाप आणि पुण्याईचा हा खेळ अखंड सुरू असतो. त्यात कुठेही गफलत होत नाही. ज्ञात-अज्ञात अशा सर्व पूर्वजांचे आत्मे या काळात जागृत झालेले असतात व आपली पुढील पिढी आपल्यासाठी काही स्मरण पूजन करते की नाही ते पाहत असतात. पूर्वजांच्या हातून जर काही नको ते अनिष्ट प्रकार सावकारीतून तळतळाट, छळवाद, लुबाडणूक पैशाच्या जोरावर खोटी कागदपत्रे करून इस्टेट हडपणे, मारामाऱया, आत्महत्या असे प्रकार घडून जे गेलेले असतात त्यांना मुक्ती नसते. त्यामुळे श्राद्धकर्म करून त्यांना मुक्ती दिल्यावर ते आशीर्वाद देऊन निघून जातात व जर श्राद्धकर्म चुकल्यास ते कोपिष्ट होऊन शापून जातात. त्याचे दुष्परिणाम दृश्य-अदृश्य रूपात भोगावे लागतात. प्रतिपदेपासून अमावास्येपर्यंत ज्यांची जी तिथी आहे त्या त्या तिथीला सर्वांचे पितर भूतलावर अवतीर्ण होतात. या सर्वात अत्यंत महत्त्वाच्या तिथी म्हणजे कृष्ण चतुर्दशी व अमावास्या या होत. त्यामुळे या पितृपक्षातील वातावरण सुतकी स्वरूपाचे असते. कुठेही उत्साह दिसून येत नाही. तिथी माहीत नसणे किंवा तत्सम काही कारणामुळे त्या तिथीला श्राद्ध करणे जमत नसेल तर सर्वपित्री अमावास्येला मात्र अवश्य करावे. ज्याचे ऋणानुबंध संपले त्यांच्यासाठी श्राद्ध केले तर ते त्यांना पोहोचते याची खात्री कोण देणार अशी भाषा हल्ली ऐकू येत असते. हिंदू धर्म पुनर्जन्मावर विश्वास ठेवणारा असल्याने आपले पूर्वज कुठेतरी कोणाच्यातरी रूपाने जन्माला आले असतीलच. मग त्यांचे श्राद्ध कशाला करायचे असा प्रश्नही पडतो तर्क वादाच्या दृष्टिकोनातून ते बरोबर असेल पण तरीही श्राद्धकर्म सोडू नये. ते चुकल्यास अनेक संकटांना तोंड द्यावे लागते. मुलांचे आरोग्य व त्यांच्या प्रगतीवर अनिष्ट परिणाम होतो. लग्ने होत नाहीत, चांगल्या नोकऱया मिळत नाहीत. व्यवसाय डबघाईला येतात. श्राद्ध हा एक शास्त्राsक्त विधी असल्याने मंत्रोच्चाराने पूर्वजांचे आवाहन करून त्यांची पूजा करून त्यांना मानाने परत पाठविले जाते. त्यामुळे पूर्वज शांत होऊन शांतता समृद्धी भाग्योदय यांचा आशीर्वाद देतात. हल्लीच्या काळात श्राद्ध कर्म करणे सर्वांनाच जमत नाही. ज्यांना जमत नाही त्यांनी पितृ पीडा निवारक स्तोत्राचे 11 पाठ सर्वपित्री अमावस्येला वाचावेत व दक्षिणेकडे तोंड करून त्यांना नमस्कार करावा. आपल्याला जे काही शक्मय आहे त्याचा नैवेद्य दाखवावा. अमुकच पाहिजे असे काही नसते. कावळे, चिमण्या, गाई, कुत्री, मांजरी, पशुपक्षी यांना घास दिला तरीदेखील पूर्वजांचे आत्मे शांत होतात.
मेष
पितृपक्षाच्या प्रभावाने शारीरिक व मानसिक विकार बळावण्याची शक्मयता. बुध शुभ उत्तम व प्रभावी आहेत त्यामुळे धनप्राप्तीचे नवीन मार्ग दिसतील.कोणत्याही मार्गाने लक्ष्मी प्रसन्न होण्याची शक्मयता .शनी गुरु सहयोग यामुळे एखादे मोठे काम पूर्ण होईल या काळात अत्रुप्त आत्म्याचा वावर जास्त असल्याने वाहन वगैरे जपून चालवा.
वृषभ
पितृपक्षाचा प्रभाव पंचम स्थानावर आहे त्यामुळे शिक्षण व संतती ,प्रेम प्रकरणे, पूर्वजांचे दोष याबाबत तुम्हाला सावध राहावे लागेल.
अमावास्या दरम्यानचे दोन दिवस सर्व बाबतीत जपून राहा कोणतेही धाडस करू नका काही महत्त्वाचे व आर्थिक व्यवहार असेल तर पूर्ण विचारांती निर्णय घ्यावा ते योग्य ठरेल राहू तुमच्या राशीत असल्याने मानसिक स्थिती जरा दोलायमान राहील.
मिथुन
पितृपक्षाचा प्रभाव वास्तु आणि कुटुंबावर जाणवेल वास्तू पवित्र व शांत आणि स्वच्छ ठेवल्यास कोणताही त्रास होणार नाही कमाई आणि खर्च यांचा ताळमेळ साधणे कठीण होईल. हर्षल नेपच्यूनच्या प्रभावामुळे काहीजण निष्कारण मनस्ताप देण्याचा प्रयत्न करतील गुरु शनी प्रभाव असल्यामुळे कोणती ही संकटे आली तरी त्यातून सुटका होईल विवाहाच्या प्रयत्नात असाल तर कुणावर विसंबून न राहता स्वतःही पूर्ण चौकशी करा.
कर्क.
पितृपक्ष सर्वपित्री अमावास्येच्या प्रभाव तृतीय स्थानावर आहे काही नवीन कामे मिळतील जे काम हाती घ्याल ते यशस्वी होईल आर्थिक स्थिती उत्तम राहील व लिखाणाशी संबंध असेल तर जरा जपून राहावे लागेल क्षुल्लक चूकदेखील उग्र स्वरूप धारण करू शकेल. नातेवाईक व शेजारी मंडळी यांच्याशी जपून वागणे आवश्यक. पूर्वीची काही प्रकरणे मुद्दाम काहीजण उकरून काढण्याचा प्रयत्न करतील.
सिंह
पितृपक्षाचा आणि सर्वपित्री अमावास्याचे परिणाम धन स्थानावर होईल. त्यामुळे कोणतेही आर्थिक व्यवहार जपून करावेत सावधानता बाळगावी.कोणतेही काम वेळेवर होईलच याची खात्री नाही. अंगच्या कलागुणांना वाव देणारे ग्रहमान आहे त्यात पारंगत असाल तर नावलौकिक आणि प्रसिद्धी मिळेल. मंगळामुळे कौटुंबिक वातावरण जरा गरम राहील. अमावास्याच्या आसपास दोन दिवस वाहन जपून चालवा.
कन्या
पितृपक्ष आणि अमावास्याचे प्रभाव तुमच्या राशीवर आहे त्यामुळे कोणतेही निर्णय घेताना सावधगिरीने घ्या. कोठेही अतिउत्साह दाखवू नका. तसेच गरज नसेल तर किमती वस्तूंची खरेदी टाळा. मानसिक संभ्रम निर्माण करणारे ग्रहमान आहे. आरोग्याच्या बाबतीत जपावे तसेच मशिनरी आणि वाहन दुरुस्तीच्या वेळी समोर उभे राहणे आवश्यक.
तूळ
पितृपक्षाचा व सर्वपित्री अमावास्याचा प्रभाव मोक्ष स्थानावर आहे त्यामुळे खर्च वाढतील मानसिक स्थिती अस्वस्थ राहील. गुप्त शत्रु काही ना काही मार्गाने त्रास देण्याचा प्रयत्न करतील. नोकरी व उद्योग व्यवसायात जुनी थकबाकी वसूल होईल मनातील काही इच्छा पूर्ण करू शकाल. देण्याघेण्याच्या व्यवहारात हा महिना विशेष महत्त्वाचा नाही. मानसिक ताण तणाव वाढेल असे वागू नका.
वृश्चिक
पितृपक्ष व सर्वपित्री अमावास्या शुभयोगात आहे. कशात काही नसताना मोठेपणा मिळण्याची संधी. प्रवासात लाभ नव्या ओळखी काही जिवलग मित्र मैत्रिणी भेटतील. पण अमावास्येच्या आसपास दोन-तीन दिवस मित्रमंडळीसह प्रवासात जाणे टाळा. वाहन जपून चालवा. बाधित ठिकाणी फार वेळ थांबू नका. कारण पितृपक्षात वातावरण अस्वस्थ करणार असते.
धनु.
उपजीविकेच्या महत्त्वाच्या दशम स्थानावर पितृपक्ष आणि सर्वपित्री अमावास्याचा प्रभाव आहे. पूर्वजांचे श्राद्ध कर्म व्यवस्थित असेल तर त्याच्या कृपेमुळे नोकरी व्यवसायात मोठे यश मिळवाल. सर्व मार्गाने पैसा बऱयापैकी मिळेल. सुतकी वातावरणामुळे कोणत्याही कामात म्हणावा तसा उत्साह राहणार नाही. अमा वास्येच्या आसपास दोन दिवस वादावादी मतभेद संघर्ष यांना वाव देऊ नका.
मकर
भाग्य स्थानावर पितृपक्ष आणि सर्वपित्री अमावास्याचा प्रभाव आहे. त्यामुळे कामाचा ताण वाढेल स्वभावात हटवादीपणा वाढेल प्रवासात अडचणी निर्माण होण्याची शक्मयता पण जे काम हाती घ्याल त्यात चांगले यश मिळेल. कोणत्याही परिस्थितीत कुणाच्याही कुरापती काढण्याच्या भानगडीत पडू नका साधीसुधी. थट्टामस्करी सुद्धा अंगलट येऊ शकते.
कुंभ
अष्टम स्थानावर पितृपक्ष आणि अमावास्येचा जोरदार प्रभाव आहे. त्यामुळे या कालखंडात जरा जपून राहणे आवश्यक ठरत.sबाधित ठिकाणे विहिरी तळी, दऱया, निसरडय़ा जागा, फरश्या ,अंधारी स्थळे अशा ठिकाणी धोका होण्याची शक्मयता दिसते आर्थिक बाबतीत ग्रहमान मध्यम आहे. अनावश्यक खर्चावर अंकुश ठेवणे महत्त्वाचे ठरेल.
मीन
सप्तम स्थानावर पितृपक्ष व अमावास्या प्रभाव. त्यामुळे वैवाहिक जीवनात शांत व समाधानी राहण्याचा प्रयत्न करा. कितीही गंभीर प्रसंग आला तरी संशयी वातावरण निर्माण होऊ देऊ नका. भागीदारी व्यवसाय असेल तर तो पारदर्शक राहील याची काळजी घ्या. तसेच कागदोपत्री व्यवहार वारंवार तपासणे योग्य ठरेल काही वेळा अति विश्वास देखील नडतो याचा अनुभव येईल. सध्या चालू असलेला व्यवसाय चुकूनही बदलू नका.