बुध. 2.2.2022 ते मंगळवार दि. 8.2.2022 पर्यंत
नमस्कार, सिद्धांत देणारा पायथॅगोरस आठवतो का? कित्येकांच्या मते अंकशास्त्राचा जनक तोच आहे. अंकशास्त्राने व्यक्तीचा स्वभाव, वागण्याची पद्धत वगैरे सहज समजू शकते. यामध्ये मुलांक, भाग्यांक, नामअंक असे अनेक प्रकारे आहेत. मुलांक म्हणजे जन्म तारखेचा एकांक, समजा जन्म तारीख 06 आहे (महिना, वर्ष धरू नये) तर तुमचा मुलांक 6, समजा जन्मतारीख 22 आहे तर 2+2ा 4 हा तुमचा मुलांक. तर तुमच्या मुलांकाप्रमाणे 2022 हे वर्ष कसे असेल, हे सांगण्याचा हा ओवीबद्ध प्रयत्न….
मुलांक 1 ः सूर्य तुमचा दातार। पुढाकार घेण्याची सवय फार। देण्यासाठी कायम तत्पर। तुम्ही राजे मनाचे ।। या वषी मानसन्मानाची प्राप्ती। घेतल्या कामांना गती। हवे तिथे बदली। अनुभवास येईल ।। सप्टेंबर महिना नाही खास। असावे अखंड सावध । घरासाठी खर्च। नक्की कराल तुम्ही ।। प्रेमीजनांना सुकाळ। नव्या नात्यांची माळ। धुतले जातील आळ। फक्त राग आवरावा ।। प्रवासात कुपथ्य करणे। मग पोटाचे दुखणे । ज्यांना हृदयाचे दुखणे। त्यांनी मात्र सांभाळावे।।
मुलांक 2ः चंद्र स्वामी, तुम्ही भावुक । चंचल मनाचे कारक। सौंदर्याचे प्रशंसक हे वर्ष खास आहे।। या वषीचा धडा। शिकवून जाईल खरा । अति चंचलतेचा खडा काढून टाकावा।। मागे केली मेहनत। फळ मिळे आता खास। संधीचे सोने येई हाता। तब्येत मात्र सांभाळा ।। जूननंतर प्रमोशन। व्यापाराला चांगले ग्रहमान । इच्छापूर्तीचे समाधान । नक्की मिळेल तुम्हासी ।। प्रेमसंबंधात वृद्धी। विवाहात समाधानी वृत्ती । तरीही मानसिक ताणाची स्थिती । या वषी संभवते ।।
मुलांक 3ः तुम्हावरी गुरुचा अंमल। यावषी हरतील खल । उदार मताचा मेळ। अंतरी तुमच्या।। मेहनतीचे मिळेल फळ। व्यापारात नवे अवसर । जुलैपर्यंत निर्धार । कामांचा करावा ।। मागील वषीपेक्षा जास्त । फायदा पैशांचा रास्त। शत्रू होतील परास्त । वाहन सुख मिळेल।। विवाहोत्सुकांचे विवाह । प्रेमींना आहे वेळ खास । मतभेद थोडे फार। संभवतात मध्याला।। तब्येतीला जपा सुरुवातीला । पोटाच्या आजारांना। दुर्लक्ष नको रोगाला। वैद्याला त्वरित दाखवावे ।।
वाचकहो, 4 ते 9 पुढच्या भागात शुभं भवतु।।
महाउपायः घरात आजारपण जात नाही. घरी आले की नकोसे वाटते. कायम घरात भांडणे होतात. घरात वास्तू दोष आहे. यावर रामबाण उपाय देतोय. मातीच्या भांडय़ात गाईच्या शेणीवर थोडे शुद्ध तूप आणि भीमसेनी कापराच्या 2 वडय़ा, 2 लवंगा घ्याव्या. रामरक्षा म्हणावी. घरातून पूर्ण फिरवून जाळावे.
सोपी वास्तू टीप- गजांतलक्ष्मीच्या हत्तीची जोडी (सोंड वर केलेला हत्ती) घरात ठेवावी. समृद्धीचे प्रतीक आहे.
मेष
तब्येतीने साथ न दिल्यामुळे थोडा वैताग येईल. धनागम उत्तम आहे. एखाद्या घटनेमुळे घरातील वातावरण आनंदी असेल. नोकरदारांना काळ अनुकूल आहे. पण त्याचबरोबर ऑफिसचे वातावरण बिघडल्याचे जाणवेल. वैवाहिक जीवनात गोडवा येईल. खर्च वाढत आहेत. सांभाळावे लागेल.
उपाय- बुधवारी लहान मुलांना मिठाई वाटा.
वृषभ
स्वभाव आनंदी असेल. इतरांना मदत केल्याचे समाधान मिळेल. कुटुंबात वादाचे प्रसंग येतील. करमणुकीकडे कल असेल. शेअर्समध्ये फायदा. नोकरीमध्ये कामाचे कौतुक होईल. पगारवाढही संभवते. वैवाहिक जोडीदाराचे पूर्ण सहकार्य मिळेल. सगळय़ा प्रकारच्या लाभाचे दिवस आहेत.
उपाय- कामाच्या ठिकाणी काळी मिठाई वाटा.
मिथुन
निष्काळजीपणामुळे तब्येतीची तक्रार येईल. तुमच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढला जाऊ शकतो. वाहनसुख उत्तम आहे. जमिनीच्या व्यवहाराकरता योग्य वेळ आहे. प्रेमप्रकरणात यश मिळेल. गुप्तशत्रूंच्या कारवाया वाढत आहेत. लक्ष द्या. वैवाहिक जीवनात वादाचे प्रसंग येतील. व्यापार धंदा उत्तम चालेल.
उपाय- गुरुवारी दत्तमंदिरात हळकुंड ठेवा.
कर्क
करार यशस्वी होतील. जमिनीच्या व्यवहारात यश मिळेल. अडकलेली कामे होतील. तब्येतीकडे लक्ष द्यावे लागेल. अचानक धनलाभाचे योग आहेत. नोकरीतील वातावरणाचा उबग येईल. जोडीदाराने तुमचा सल्ला न ऐकल्याने नाराज व्हाल. धार्मिक स्थळाला भेट द्याल. लाभाचे उत्तम योग.
उपायः आठवडाभर मंदिरात एखादी सेवा करा.
सिंह
आत्मविश्वासाने प्रसंगावर मात कराल. बोलण्याची छाप पडेल. धनप्राप्ती उत्तम आहे. कुटुंबासोबत वेळ घालवाल. तब्येतीच्या लहान मोठय़ा तक्रारी उद्भवतील. लेखी कामात यश मिळेल. गुंतवणुकीकरता काळ योग्य नाही. ऑफिसमध्ये वादाचे प्रसंग येतील. वैवाहिक जोडीदाराच्या स्वभावदोषामुळे मनस्ताप.
उपायः सोमवारी शंकराला उसाच्या रसाचा अभिषेक करा.
कन्या
प्रगतीचे मार्ग सापडत असतानाच तब्येतीचीही साथ मिळत आहे. पैशासंबंधी केलेल्या योजना सफल होतील. करार मदार यशस्वी होतील. जमिनीचे व्यवहार टाळा. आईच्या तब्येतीची काळजी वाटेल. नोकरीत मनस्ताप, वैवाहिक जीवनात आनंद. मानसन्मानाचे योग आहेत. मित्रांची साथ मिळेल.
उपायः ‘ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः’ मंत्राचा जमेल तसा जप करा.
तुळ
शारीरिक व्याधी दूर होतील. प्रभाव प्रशंसा वाढेल. धनागम उत्तम आहे. प्रगतीच्या वाटा मिळतील. कागदोपत्री व्यवहारात चूक होण्याची शक्मयता आहे. नोकरीमध्ये प्रभाव वाढेल. बढती, पगारवाढीचे योग. वैवाहिक जोडीदाराच्या वागण्याने त्रस्त व्हाल. कित्येक बाबतीत नशीबवान ठराल.
उपायः शुक्रवारी देवीला कुंकुमार्चन करावे.
वृश्चिक
या ना त्या कारणामुळे बिघडणारी तब्येत सुधारू लागेल. पण कुपथ्य टाळा. कुटुंबात धाकटय़ा भावंडांमुळे वाद संभवतो. जमिनीचे व्यवहार लांबल्यामुळे त्रस्त व्हाल. शेअर्समध्ये फायदा होईल. नोकरीच्या ठिकाणी वातावरण ताणतणावाचे. वैवाहिक जीवन समाधानी. मित्रांकडून फायदा.
उपायः मंगळवारी सापाच्या मूर्तीवर दुधाचा अभिषेक करा.
धनु
नोकरीच्या ठिकाणी मनासारखी घटना घडल्याने मन खूष असेल. पण वैवाहिक जीवनात वादाचे प्रसंग येतील. बोलताना शब्द जपून वापरा. छोटे मोठे आजार संभवतात. मानसन्मानात वाढ होईल. व्यापार धंदा उत्तम चालेल. लाभाचे योग आहेत. खर्चावर नियंत्रण ठेवा.
उपायः रविवारी गरजूंना अन्नदान करा.
मकर
छोटय़ा मोठय़ा प्रवासाचे योग आहेत. भावंडांची साथ मिळेल. तब्येतीची काळजी घ्या. पैशांची चिंता कराल. येणी वसूल न झाल्याने चिडचिड होईल. देवदर्शनाला जाण्याची योजना आखाल. कामाच्या ठिकाणी नशिबाची साथ आहे. अति लोभ टाळला तर लाभ होतील.
उपायः मंगळवारी हनुमानाला शेंदूराचा लेप लावून घ्या.
कुंभ
धनप्राप्ती उत्तम असेल. तुमच्या सल्ल्यामुळे दुसऱयांचा फायदा होईल. स्वादिष्ट पदार्थावर ताव माराल. प्रवास टाळा. जमिनीच्या कामात यश. आपल्या योजना कोणालाही सांगू नका. वाहन जपून चालवा. एखादी गुप्त बातमी कळेल. भाग्याची साथ आहे. मानसन्मानात वृद्धी होईल.
उपायः बुधवारी 11 रुईच्या पानांवर ‘राम’ लिहून माळ करून मारुतीला घाला.
मीन
तब्येत उत्तम असेल पण कुपथ्य टाळा. छोटय़ा प्रवासाचे योग आहेत. नोकरीत तुमच्या कामाचे कौतुक होईल. येणी वसूल होतील. शत्रूंच्या कारवाया वाढत आहेत, दुर्लक्ष करू नका. वैवाहिक जीवन आनंदमय असेल. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. भाग्याची साथ चांगली आहे.
उपायः सोमवारी गरजूंना अन्नदान करा.