दिशा कोणत्या त्यांचे दिशापालक कोण ?
कोणतीही पूजा अथवा शांती करताना अष्टदिशाचे स्मरण करून सर्व कार्यात यश देण्याविषयी त्यांची प्रार्थना केली जाते. अष्टदिशा प्रसन्न झाल्याशिवाय कोणत्याही कामात यश मिळत नाही. पूजा करताना लोक नेमके दिशावंदन करण्यास विसरतात. त्यामुळे त्यांना पूजेचे फळ मिळत नाही. या अष्टदिशा कोणत्या व त्यांचे स्वामी कोण याची माहिती खाली दिलेली आहे. पूर्व, पश्चिम ,उत्तर, दक्षिण या चार मुख्य दिशा व आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य या चार उपदिशा अशा आठ दिशा आहेत. आकाश व पाताळ यांचाही समावेश अवश्य केला पाहिजे. पूर्व दिशा : या दिशेचा दिशापालक इंद्रदेव आहे. त्याचे वाहन (ऐरावत) आहे. त्याचे आयुध वज्रायुध हे आहे. या दिशेची राशी मेष (1), वृषभ (2) आहे. या दिशेचा रंग श्वेत (पांढरा) आहे. ‘अष्टलक्ष्मी’ मध्ये या दिशेला ऐश्वर्यलक्ष्मीचे स्थान आहे. या दिशेचा ग्रह सूर्य (रवी) हा आहे. पश्चिम दिशा : या दिशेचा दिशापालक वरुणदेव आहे. त्याचे वाहन ‘मगर’ व आयुध ‘पाश’ हे आहे. या दिशेची राशी तुल (7) व वृश्चिक (8) आहे. या दिशेचा रंग लाल, तांबडा व काळा आहे. ‘अष्टलक्ष्मी’मध्ये या दिशेला गजलक्ष्मीचे स्थान आहे. या दिशेचा ग्रह शनिदेव हा आहे. उत्तर दिशा : या दिशेचा दिशापालक कुबेरदेव आहे. त्याचे वाहन पांढरा घोडा आहे. त्याचे आयुध खड्ग. या दिशेची राशी मकर (10), कुंभ (11) आहे. या दिशेचा रंग पिवळा, पोपटी, हिरवा, पिवळसर पांढरा आहे. ‘अष्टलक्ष्मी’मध्ये या दिशेला धनलक्ष्मीचे स्थान आहे. या दिशेचा ग्रह बुध हा आहे. दक्षिण दिशा : या दिशेचा दिशापालक यमदेव आहे. त्याचे वाहन महिष व आयुध कालपाश हे आहे. या दिशेची राशी कर्क (4), सिंह (5) आहे. या दिशेचा रंग लाल आहे. ‘अष्टलक्ष्मी’ मध्ये या दिशेला आदिलक्ष्मीचे स्थान आहे. या दिशेचा ग्रह मंगळ हा आहे. आग्नेय दिशा : या दिशेचा दिशापालक अग्नीदेव आहे. वाहन मेंढा आहे. त्याचे आयुध राग (क्रोध) हे आहे. या दिशेची राशी मिथुन (3) आहे. या दिशेचा रंग लाल/तांबडा आहे. ‘अष्टलक्ष्मी’मध्ये या दिशेला धान्यलक्ष्मीचे स्थान आहे. या दिशेचा ग्रह शुक्र हा आहे. नैऋत्य दिशा : या दिशेचा दिशापालक नैऋतीदेव आहे. त्याचे वाहन नर (मनुष्य) आहे. या दिशेची राशी कन्या (6) आहे. या दिशेचा रंग धूम्र आहे. ‘अष्टलक्ष्मी’मध्ये या दिशेला धैर्यलक्ष्मीचे स्थान आहे. या दिशेचे ग्रह राहू-केतू हे आहेत. वायव्य दिशा : या दिशेचा दिशापालक वायूदेव आहे. वाहन हरीण आहे. त्याचे आयुध ध्वज हे आहे. या दिशेची राशी धनु (9) आहे. या दिशेचा रंग पांढरा, निळा, काळा, करडा आहे. ‘अष्टलक्ष्मी’मध्ये या दिशेला विजयलक्ष्मीचे स्थान आहे. या दिशेचा ग्रह चंद्र हा आहे. ईशान्य दिशा : या दिशेचा दिशापालक देवाधिदेव महादेव आहे. त्याची पत्नी पार्वती देवी आहे. त्याचे वाहन वृषभ (बैल) आहे. त्याचे आयुध त्रिशूळ हे आहे. या दिशेची राशी मीन आहे. या दिशेचा रंग हिरवा, पांढरा आहे. ‘अष्टलक्ष्मी’मध्ये या दिशेला संतानलक्ष्मीचे स्थान आहे. या दिशेचा ग्रह गुरु हा आहे पण .ज्योतिषशास्त्रानुसार राशींच्या दिशा जरा वेगळय़ा येतात. रोज या दिशांचे स्मरण करून पूजा केल्यास त्यांचा आशीर्वाद मिळतो व अंगीकृत कार्यात यश मिळते.
मेष –
प्रचंड वाढलेल्या कर्जातून मुक्तता, आरोग्य सुधारणा, शत्रुपीडा कमी होणे, गुप्तशत्रु नामशेष होणे, तुरुंगातून सुटका, पोलीस केसेसमधून मुक्त होणे, यासाठी येत्या कोजागरी पौर्णिमेला पूजा करा. त्याचा अनुभव चांगला येईल, पण तुमची बाजू बरोबर असणे आवश्यक आहे. बुध-हर्षल प्रतियोगामुळे कागदोपत्री व्यवहारात घोटाळे होतील. शुक्र-मंगळ योगामुळे अनिष्ट मार्गाकडे मन वळेल. तरुण-तरुणींनी सावधानता बाळगावी. केतुचे भ्रमण आरोग्याला घातक आहे. आहारावर नियंत्रण ठेवा.
वृषभ –
मित्रमंडळींकडून फसवणूक झाली असेल, कुठे पैसे अडकले असतील, प्रेम प्रकरणात गडबड गोंधळ झालेला असेल तर येत्या कोजागिरी पौर्णिमेला देवीपूजन करा. राशीस्वामी शुक्र, मंगळाच्या प्रतियोगात आहे. काहीजण ओळखीचा गैरफायदा घेऊन नको ते प्रकार करण्याची शक्मयता आहे, जपावे लागेल. महत्त्वाची कागदपत्रे अथवा वस्तू, फोन वगैरे कुणाच्या हाती देऊ नका. गैरवापर केला जाऊ शकतो. चित्रपट क्षेत्राची आवड असणाऱया तरुण-तरुणींनी सध्या त्याकडे न वळणे हितावह ठरेल.
मिथुन –
भगीरथ प्रयत्न करूनही कामे होत नसतील, निष्कारण तुमचे नाव कुणीतरी बदनाम करण्याचा प्रयत्न करीत असेल, वारंवार वाहन बिघडत असेल, कर्ज वाढले असेल तर त्यातून सुटका होण्यासाठी येत्या कोजागरी पौर्णिमेला देवीचे कोणतेही प्रभावी स्तोत्र वाचावे. राशीस्वामी बुध-रवी हर्षलच्या प्रतियोगात आहे. घाईगडबडीत काही निर्णय चुकू शकतात, तसेच आर्थिक व्यवहार, घोटाळे होऊ शकतात. त्यासाठी सर्व बाबतीत सावध राहणे आवश्यक समजावे. काही अपरिचित व्यक्ति कुटुंबातील ओळखीचा गैरफायदा घेऊन त्याचा ब्लॅकमेलसाठी उपयोग करू शकतील. सावध राहा.
कर्क –
नोकरी व्यवसायात येणारे अडथळे वरि÷ांचा जाच, पगार वाढ न होणे, काम करूनही त्याचे चीज न होणे, इतरांच्या कामाची जबाबदारी पडणे तसेच वारंवार नोकरी बदलण्याचा प्रसंग येत असेल तर येत्या कोजागरी पौर्णिमेला संकल्पपूर्वक देवीपूजन करा. चतुर्थातील बिघडलेला शुक्र किमती वस्तू अचानक गायब करू शकेल किंवा चोरीस जाऊ शकेल. रवी-बुध-हर्षल योग अत्यंत विचित्र आहे. सहज म्हणून एखाद्याने केलेली मदत धोकादायक ठरू शकते, अथवा पैसे अडकु शकतात. एखाद्या मित्र-मैत्रिणीला दिलेले वाहन दुर्घटनाग्रस्त होऊ शकते. त्यासाठी काळजी घ्या. अनावश्यक खर्च टाळण्याचा प्रयत्न केल्यास पुढे त्याचा निश्चित फायदा होईल. कोणतेही पाहुणे अथवा नवोदित व्यक्तींना तूर्तास घरी येण्याचे आमंत्रण देऊ नका.
सिंह –
प्रवासात येणारे अडथळे, अपघात, दुर्घटना, गैरसमज, मंगलकार्यातील विघ्ने, प्रति÷sला धोका, सासरच्या लोकांकडून त्रास असे प्रकार घडत असतील तर येत्या कोजागरी पौर्णिमेला संकल्पपूर्वक देवीपूजन अवश्य करा. त्याचा अनुभव चांगला येईल. धनस्थानी शुक्र दूषित आहे. नेत्रदोष निर्माण होतील. खर्चावर नियंत्रण राहणार नाही काही जणांच्या गोड बोलण्याला बोलून अनैतिक मार्गाने अर्थार्जन करण्याकडे मन वळेल. कोणत्याही बाबतीत चारित्र्य बिघडणार नाही, याकडे विशेष लक्ष द्या.
कन्या –
दूषित शुक्र तुमच्या राशीत असल्याने नको त्या गोष्टी करण्याकडे मन मिळेल. मदतीचे आश्वासन देणारी व्यक्ती अचानक शब्द फिरवील. विवाहाची बोलणी सुरू असताना बोलण्याच्या ओघात खऱया बाबी उघड होतील. त्यामुळे गोंधळ माजण्याची शक्मयता. वस्तुस्थितीच्या बाहेरील कोणत्याही गोष्टी मित्र-मैत्रीण यांच्यासमोर बोलू नका. घराण्यात जर काही अडचणी येत असतील तर मुक्मया प्राण्यांचे संवर्धन अथवा त्यांचे पालनपोषण करा. बऱयाच अडचणीतून सुटका होईल. रवि-बुध-हर्षल विचित्र योगात आहेत. काही महत्त्वाच्या प्रसंगी अप्रिय घटना घडू शकतात. त्यासाठी सावधानता बाळगावी. कोजागरी पौर्णिमेचे देवीपूजन अनेक बाबतीत लाभदायक ठरणार आहे.
तूळ –
प्रत्येक वेळेला समोरची व्यक्ती बरोबर असेलच असे नसते. त्यामुळे काही निर्णय स्वतःच्या मनाने घेणेच योग्य ठरते. या आठवडय़ात काही किचकट समस्या उद्भवतील. वैवाहिक जीवनात येणारे अडथळे, घटस्फोटापर्यंत गेलेली प्रकरणे, फसवणूक, प्रवासात झालेले नुकसान अशा गोष्टीतून सुटका होण्यासाठी कोजागरी पौर्णिमेचे पूजन अवश्य करा. यादिवशी सर्व तऱहेचे पावित्र्य बाळगा. रवि -हर्षल-भ्रमण मानसिक तणाव वाढवेल. आपले म्हणणारे काहीजण शत्रुत्व करू लागतील.
वृश्चिक –
आरोग्याच्या तक्रारी, हाती पैसा न टिकणे, मुक्मया प्राण्यांचे बळी व तत्सम प्रकारातून निर्माण झालेले शाप, नातेवाईकांकडून फसवणूक असे प्रकार घडत असतील तर येत्या कोजागरी पौर्णिमेला देवीपूजन आवश्य करा. लाभस्थानातील दूषित शुक्रामुळे मित्र-मैत्रिणी ऐनवेळी दगा देतील. ठरलेली कामे वेळेत होतील असे नाही, त्यामुळे जे शक्मय आहे तेवढे काम स्वतः करण्याचा प्रयत्न करा. आर्थिक बाबतीत कोणत्याही अडचणी येणार नाहीत, पण तरीसुद्धा चैनी वृत्तीवर लगाम आवश्यक. विवाहाच्या वाटाघाटी सुरु असतील तर कोण काय बोलतो याकडे लक्ष ठेवा. एखादा चुकीचा शब्द ठरलेल्या लग्नात मोडता घालू शकतो. घर, वाहन खरेदी करण्यास अनुकूल काळ आहे. व्यवसायात बऱयाच गोष्टी मनासारख्या घडू शकतात.
धनु –
मनात शंका ठेवून केलेले कोणतेही काम यशस्वी होत नाही. त्यासाठी कोणतेही काम करण्यापूर्वी त्याची योग्य शहानिशा करून मग त्यात हात घालावा. जे काम कराल ते हमखास यशस्वी होईल, पण फायदा नुकसानीकडे फारसे लक्ष देऊ नका. कुणाच्याही घरी गेल्यास त्यांच्या खाजगी आयुष्यात चुकूनही लक्ष घालू नका. निष्कारण गैरसमज निर्माण होईल. रवि-बुध-हर्षल अनपेक्षितरीत्या काहीतरी मोठा लाभ घडवू शकतात. नोकरी-व्यवसायात नव्या ऑर्डरी मिळण्याचे योग. कोजागिरी पौर्णिमेची पूजा मुलाबाळांसंदर्भात उत्तम ठरणार आहे.
मकर –
काही जणांना आपली प्रगती पाहवत नाही, राहत्या वास्तूला नजर लागण्यासारखे प्रकार घडतात, कुटुंबात एकी राहत नाही, मुलाबाळांच्या लग्नात अडथळे येतात असे प्रकार घडत असतील तर कोजागरी पौर्णिमेला संकल्पपूर्वक देवीपूजन करा. अडलेली कामे होऊ लागतील. जत्रा-यात्रा अशा ठिकाणी हरवाहरवी होऊ शकते. साडेसाती सुरू आहे, त्यामुळे कोणतेही काम मन शांत ठेवूनच करावे. कामे रखडणार नाहीत, याकडे लक्ष द्या.
कुंभ –
ग्रहमान आर्थिक बाबतीत लाभदायक आहे. जर तुमचे प्रयत्न योग्य मार्गाने चालू असतील तर हमखास यश मिळेल. आर्थिक स्थिती सुधारेल. जुनी थकबाकी वसूल होईल. कौटुंबिक जीवनात सुख समाधान राहील. त्यांच्या अपेक्षा पूर्ण करू शकाल. नोकरी-व्यवसायात आवश्यक त्या जागी काम करण्याची संधी मिळेल. वितंडवाद, बदनामी, कौटुंबिक संघर्ष, आर्थिक हानी, सतत मोडतोड, दुरुस्ती यांचे प्रसंग येत असतील तर कोजागरी पौर्णिमेला देवीपूजन करा. अनेक समस्या मिटतील. शुक्राचे भ्रमण अपेक्षित यश देणार नाही. बाराव्या शनिमुळे महत्त्वाची कामे अडू शकतात.
मीन –
परिस्थितीनुरूप बदल न केल्यास प्रगती होणार नाही, हे लक्षात ठेवून वागावे. काही कामाची पद्धत बदलावी लागेल. सुसूत्रता व योग्य नियोजन यांचा अवलंब करा. कमी श्रमात मोठी कामे होतील, एखादी व्यक्ती आपले काम करीलच या आशेवर राहू नका. दूषित शुक्राचे भ्रमण संशयाचे वातावरण निर्माण करील. लाभातील शनिमुळे फार मोठे असे कायमस्वरूपी काम होऊ शकेल. कोजागरी पौर्णिमेची पूजा आर्थिक भरभराटीस सहाय्यक ठरू शकते. विवाहाच्या प्रयत्नात असाल तर यशस्वी व्हाल. जुनाट व गंजलेल्या वस्तूंमुळे आर्थिक प्रश्न उद्भवतील.