बुधवार 26 ऑगस्ट मंगळवार दि 1 सप्टेंबर 2020
धार्मिक कृती करताना तारतम्य बाळगणे आवश्यक!
घर बांधून पूर्ण झाल्यावर वास्तुशांती करण्याची प्रथा आहे पण, या शांतीच्या वेळी ज्या काही अनिष्ट गोष्टी घडतात त्या पाहून मन विषण्ण होते. वास्तुशांती अशीच केली पाहिजे, तशीच केली पाहिजे, इतका खर्च करा, इतक्मया लोकांना जेवण घातले पाहिजे असे काहीजण सांगतात पण, त्यात काहीही अर्थ नाही. कर्ज काढून सण साजरे करा, असे कोणतेही शास्त्र सांगत नाही. आपली आर्थिक क्षमता पाहून कमीतकमी खर्चात आपण काय करू शकतो, आपली जागा व आपल्या अडचणी तसेच मनुष्यबळ किती व कसे आहे, या सर्वांचा विचार करूनच वास्तुशांती थोडक्यात करावी. वास्तुशांतीला लागणारे साहित्य ताजे वापरले जात नाही, तसेच आणलेल्या सर्व साहित्याचा वापर होत नाही, अशा तक्रारीही ऐकू येतात. कमीतकमी लोकांना आमंत्रण द्या. ते संतुष्ट होऊन गेले तरच वास्तुपुरुष शांत होतो. निमंत्रितांपैकी जर कुणी उपाशी गेले तर वास्तुपुरुषाचा कोप होतो हे अनेकांना माहीत नसेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्यांना वास्तुशांती करणे शक्मय नसेल त्यांनी त्या घरात सर्व प्रकारची शुद्धता पाळून गणेश अथर्वशीर्षाची कमीत कमी 108 आवर्तने करून गणेश सहस्त्रनामावली वाचून त्या घरात प्रवेश करावा. त्यानंतर शक्मय होईल तेव्हा वास्तुशांती करून घ्यावी. काही कारणाने वास्तुशांती करणे शक्मय नसेल तर उदकशांती करावी हा पर्याय आहे. वास्तुशांतीच्या वेळी काही गोष्टी खटकल्या त्यातील. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वास्तुशांतीच्यावेळी त्या घरात गाय आणण्याचा प्रघात आहे पण, घर लहान असेल किंवा तिसऱया-चौथ्या मजल्यावर असेल अशावेळी तुम्ही काय करणार? केवळ एखाद्याने सांगितले म्हणून गाय घरात आणणे, तिला मारून मुटकून वर चढवणे, गाय दारातून आत जाणे शक्मय नसेल तर रक्तबंबाळ करून जबरदस्तीने आत घेणे, या प्रथेला काहीही अर्थ नाही. असे करून त्या गायीचा शाप मात्र नक्कीच लागेल. पूर्वीच्या काळी प्रशस्त वाडे, जमीन वगैरे असायची. त्यावेळी हे सर्व शक्मय असायचे पण हल्ली घरे छोटी असल्याने गाईला आत घेणे शक्मय नसते काहीजण गाईला लिफ्टमधून वर चढवत असतात हा तर महाभयानक प्रकार आहे. गाईला कसेतरी करून घरात घेतात व वास्तुशांती सुरू करतात पण, त्या मुक्मया प्राण्यांचे हाल हाल करून वास्तुशांती करण्यात काय अर्थ आहे? अशाने वास्तुपुरुष तरी शांत होईल का? मन:शांती मिळेल काय? याचा विचार करणे आवश्यक आहे. भटजींनी देखील वास्तुशांतीसाठी गाय आणलीच पाहिजे असा आग्रह धरू नये. वास्तुशांतीच्या दिवशी जेथे गाय असेल तेथे तिला गोग्रास देऊन नमस्कार करून तिचा आशीर्वाद घ्यावा इतके. केले तरी वास्तू शांत होते व त्या देवतेचा आशीर्वाद मिळतो. वास्तु सर्व प्रकारे शांत राहावी यासाठी काही मंत्र आहेत ते सर्वांनी रोज न चुकता म्हणावेत. वास्तुशांती करणाऱया गुरुजी किंवा भटजींना ते माहीत असतात ते त्यांच्याकडून विचारून घ्यावेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे एकदा वास्तुशांती केल्यानंतर त्या जागेत त्या वास्तुविषयी चुकूनही काही अनिष्ट गोष्टी बोलू नयेत, कारण त्याच्यामुळे ही वास्तुदोष निर्माण होतो. अनेकजण वास्तुशास्त्रज्ञ घरी आणतात व त्याच्याकडून काहीतरी ऐकून त्या वास्तूविषयी गैरसमज करून घेतात. त्यामुळे ती वास्तू कोपते आणि नव्याने संकटाला आमंत्रण दिल्यासारखे होते, हे लक्षात ठेवावे.
मेष-
गुरुची उत्तम स्थिती असल्याने वैवाहिक जोडीदार, भागीदार आणि मित्र त्यांच्याकडून भरपूर सहकार्य मिळेल. नोकरीमध्ये उच्च अधिकारी आपल्याला सहकार्य करतील. तुम्ही केलेल्या कार्याची समाजामध्ये स्तुती केली जाईल. सप्ताहाच्या उत्तरार्धात एखादी महत्वाची शुभ घटना घडेल. त्यामुळे मन प्रसन्न राहील. चतुर्थात येणारा शुक्र कौटुंबिक जीवनात सुख-समाधान निर्माण करील. त्यामुळे उत्साहाने अनेक कामे पूर्ण करू शकाल.
वृषभ –
व्यापार व्यवसायात फायदा होईल. मित्रमंडळींच्या मदतीने तुमची प्रगती सुरू होईल. विषारी रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. कुठूनतरी अनिष्ट सूचना कानी येतील. जवळपासचा प्रवास लाभदायक ठरेल. समाजात यश, कीर्ती व प्रति÷ा वाढेल या आठवडय़ात येणाऱया संधी तुमचे भाग्य सुधारतील. मनातील काही गोष्टी प्रत्यक्षात उतरतील.
मिथुन –
ज्यांचा काहीही संबंध नाही अशा व्यक्तींचा निरर्थक विचार करीत बसू नका. आर्थिक अडचणी येणार नाहीत पण, देणेकरी मात्र मागे लागण्याची शक्मयता आहे. कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवून मोठी गुंतवणूक करू नका. धार्मिक आणि सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. कितीही अडथळे आले तरी त्यातून सहीसलामत बाहेर पडाल. धार्मिक कार्याकडे तुमची रुची वाढेल. एखादे अशक्मय काम हाती घेऊन ते पूर्ण कराल.
कर्क-
व्यापार,व्यवसाय,नोकरीमध्ये उत्तम योग असले तरी काही बाबतीत विचारपूर्वक पावले उचलावी लागतील. इष्टमित्र, घर व कुटुंबातील लोकांची मदत होईल. धन, यश, कीर्ती यांची प्राप्ती होईल. राजकीय क्षेत्रात असाल तर एखादे उच्च पद मिळू शकेल. समाजात व नातेवाईकात मित्रांमध्ये आनंदी वातावरण राहील. नवीन ओळखी लाभदायक ठरतील.
सिंह –
सर्व पत्रव्यवहार लाभदायक ठरतील. जे काम हाती घ्याल, त्यात निश्चित यश मिळवाल. पण वाणीवर नियंत्रण ठेवावे लागेल. थोडीशी सावधानी बाळगा कारण ज्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवणार आहात तेच तुम्हाला दगा देण्याची शक्मयता. पूर्वीची काही प्रकरणे संघर्ष निर्माण करण्याची शक्मयता आहे.
कन्या –
हाती घेतलेली कामे पूर्ण होतील. ग्रहांची स्थिती मध्यम आहे. काही बाबतीतील अपयशाने शत्रु आनंदी राहतील पण, त्यांचे काहीही चालणार नाही. काही चुकीचे निर्णय घेतल्याने यश मिळणे दुरापास्त होईल. अनोळखी लोकांपासून फसवणूक होऊ शकते. मनातील योजलेली काही कामे स्वतःलाच केल्यास ती यशस्वी होतील. व्यापार, व्यवसायात, नोकरीत विचारपूर्वक पावले टाकावी लागतील.
तूळ –
जेवढी आवक होईल, त्यापेक्षा दुप्पट खर्च होईल. महत्त्वाची कामे वेळेवर न झाल्याने स्वभाव चिडचिडा होण्याची शक्मयता आहे. आवक वाढविण्?यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी ठरतील. महत्त्वाची माहिती मिळाल्याने त्याचा फायदा तुमच्या करिअरवर होऊ शकतो. कुटुंबात सुख, शांती व समाधान राहील. मित्रमंडळाकडून तुमची प्रशंसा होईल.
वृश्चिक –
एखादी व्यक्ती गोड बोलते म्हणजे ती तशी असतेच असे नाही. यासाठी माणसे ओळखून त्याप्रमाणे त्यांच्याशी व्यवहार ठेवा. डोकेदुखीच्या आजाराने त्रस्त व्हाल. कामाचा बोजा वाढल्याने शारीरिक प्रकृतीवर परिणाम होईल. आर्थिक बाबतीत केलेले कोणतेही काम यशस्वी होईल. नवीन वस्तूंची खरेदी कराल. सरकारी अधिकारी तुमच्यावर खूश राहतील. जवळचे प्रवास होतील.
धनु –
या महिन्यात रवि-गुरूच्या शुभयोगामुळे अनेक महत्त्वाची कामे हातावेगळी करू शकाल. जे शक्मय नाही तेही साध्य झालेले दिसेल. काही विचित्र घटनांचे शुभाशुभ परिणामही जाणवतील. व्यापार-व्यवसायात कोरोनामुळे आलेला गतिरोध कमी होईल. व्यापार-व्यवसायात नव्या दिशा मिळतील. अचानक दूरचे प्रवास घडून काही ओळखीच्या लोकांमध्ये वावरण्याची संधी मिळेल. राजकीय क्षेत्रात असाल तर तुमचे वजन वाढेल. एखाद्या नेत्याशी गाठ भेट होण्याची शक्मयता. कोर्टकचेरीच्या कामात उत्तम यश. उत्तरार्धात शुभ समाचार कानावर पडतील.
मकर –
आपल्या हातून कळत नकळत काही चुका होत असतात पण, त्यांच्या प्रभाव केव्हा पडेल ते काळ ठरवत असतो. या आठवडय़ात तसे काही अनुभव येण्याची शक्मयता आहे. पूर्वी जर कुणी तुम्हाला मदत केली असेल तर त्याला विसरणे तुमच्या अंगलट येऊ शकते. पुढे ज्या काही समस्या उद्भवणार आहेत त्याला तोंड देण्याची तयारी आतापासूनच करावी लागेल. इतर बाबतीत मात्र ग्रहमान शुभ आहे. वास्तुविषयक व्यवहार पूर्ण होतील. कर्ज काढले असेल तर त्यातून मार्ग निघेल.
कुंभ –
या महिन्यात संपत्ती आणि मालमत्ता यांचे वाद-विवाद मिटविण्यास अनुकूल वातावरण राहील. पैसा येईल पण, टिकण्याची शक्मयता कमी. मित्रांशी अथवा नातेवाईकांशी कडाक्मयाचे मतभेद होऊ शकतील. वाहन सावधपणे चालवा. प्रगतीचे अनेक मार्ग दिसून येतील. त्यामुळे मनाला समाधान मिळेल. राजकीय कामात असाल तर नक्की यश मिळेल. जिवावरचे एखादी गंभीर संकट परस्पर निवारण होऊन जाईल. पण देवाधर्माचा मात्र चुकूनही अपमान करू नका.
मीन –
रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील. विद्यार्थ्यांना शिक्षणात चांगले दिवस. अचानक वाढलेल्या खर्चाने त्रस्त व्हाल. त्यासाठी कमाई व खर्च यांचे गणित व्यवस्थित ठेवा. दीर्घकाळ दूर असलेल्या नातेवाईकांचे आगमन होईल. नोकरी व्यवसायात आपले उच्चाधिकारी प्रशंसा करू लागतील. भाग्योदयकारक ग्रहमान आहे. शुभवार्ता कानावर येतील. आर्थिकदृष्टीने उत्तम योग पण, काही किरकोळ चुकामुळे बदनामीला सामोरे जावे लागेल, त्यासाठी सावध सावध राहा. प्रेमप्रकरणे वगैरे असतील तर कुटुंबापासून लपवून ठेवू नका, अन्यथा पुढे अनवस्था प्रसंग ओढवेल.