क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
मोहाली येथे 59 व्या राष्ट्रीय रोलर स्केटिंग स्पर्धेत बेळगावच्या रोलर स्केटिंग अकॅडमीच्या स्केटिंगपटूंनी एक सुवर्ण, एक रौप्य व चार कांस्यपदके मिळवित यश संपादन केले. या राष्ट्रीय स्पीड स्केटिंग स्पर्धेत अवनीस कामण्णावरने एक सुवर्ण आणि दोन कांस्यपदक, आराध्या पी.ने एक रौप्यपदक मिळविले. इनलाईन हॉकी प्रकारात भक्ती हिंडलगेकरने एक कांस्य तसेच अक्षता सावंत हिने कांस्यपदक पटकाविले. वरील सर्व खेळाडू लिंगराज महाविद्यालयाच्या स्केटिंग रिंकवर सराव करीत असून त्यांना स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, योगेश कुलकर्णी, मंजुनाथ मंडोळकर, विठ्ठल गगणे, अनुष्का शंकरगौडा यांचे मार्गदर्शन तर माजी खासदार डॉ. प्रभाकर कोरे, आमदार शाम घाटगे, राज घाटगे, उमेश कलघटगी यांचे प्रोत्साहन लाभत आहे.