नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचे ट्विटर अकाऊंट लॉक करण्यात आले आहे. आता यानंतर काँग्रेसच्या पाच वरिष्ठ नेत्यांचं ट्विटर अकाऊंट लॉक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेसकडून तसा दावा देखील करण्यात आला आहे.काँग्रेसचे संपर्क विभाग प्रमुख रणदीप सुरजेवाला, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि माजी केंद्रीय मंत्री अजय माकन, लोकसभेतील पक्षाचे व्हीप माणिकम टागोर, आसाम प्रभारी आणि माजी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह आणि महिला काँग्रेस अध्यक्षा सुष्मिता देव यांच्या अकाऊंटवर ट्विटरने कारवाई करण्यात आल्याचा दावा काँग्रेसकडून बुधवारी करण्यात आली आहे.
या सगळ्या प्रकारवर काँग्रेसचे सचिव प्रणव झा म्हणाले की, राहुल गांधी यांच्यानंतर नरेंद्र मोदींनी आणि ट्विटरचे सीईओ जॅक डोरसे यांनी रणदीप सुरजेवाला, अजय माकन, सुष्मिता देव यांचं ट्विटर अकाऊंट लॉक केलं आहे. याबाबत काँग्रेस विरोध दर्शवत आहे. सर्वांसोबत अन्यायासाठी लढा सुरू ठेवण्याचे वचन दिले आहे.
दिल्लीतील नांगल येथील एका मुलीवर बलात्कार झाला होता. या पीडित कुटुंबियांची राहुल गांधी यांनी भेट घेऊन त्यानंतर त्यांनी पीडितेच्या आई-वडिलांसोबतचा फोटो ट्वीट केला होता. तसेच पीडित कुटुंबियांना न्याय देण्याची मागणी केली होती. या कुटुंबाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत पीडितेच्या कुटुंबियांसोबत असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटलं होत. याच ट्वीटनंतर राहुल गांधी यांच्या ट्विटर अकाऊंटवर ट्विटरकडून कारवाई करण्यात आली होती.