जानेवारी-मार्चमध्ये 66,167 घरांची विक्री – मागील तिमाहीच्या तुलनेत 12 टक्क्यांची वाढ
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
घर खरेदी करणाऱयाचा विश्वास वाढण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून करयात आलेल्या वेगवेळय़ा धोरणामुळे सकारात्मक प्रभाव राहिल्याचे दिसून आले आहे. वर्ष 2021 च्या पहिल्या तिमाहीत जानेवारी ते मार्च तिमाही दरम्यान घरांची विक्री 12 टक्क्यांनी वाढली आहे. अशी माहिती प्रॉपर्टी ऍडव्हाइजर प्रॉपटायगर डॉट कॉमच्या ताजा अहवालानुसार याच दरम्यान देशातील 8 प्रमुख शहरामधील एकूण घरांची विक्री ही 66,175 इतकी झाली आहे. सदरची वाढ ही वार्षिक आधारावर 5 टक्क्यांची घसरण राहिली आहे.
केंद्र आणि राज्य सरकारांकडून करण्यात आलेल्या विविध नियमावलीमुळे रियल इस्टेट मार्केट हे सकारात्मक गतीवर राहिले आहे. यासह आरबीआय आणि बँकिंग सिस्टमकडून गृहकर्जात कमीत कमी किमतीमुळे घर खरेदी सोपी होणार असल्याचे संकेत आहेत.
तिमाही आधारावर घर विक्रीतील वाढ
शहर चौथी तिमाही 2020 पहिली तिमाही 2021 वाढ
अहमदाबाद 3,125…………. 4,687………. 50…
बेंगळूर…… 7,660…………. 7,431……….. -3…
एनसीआर.. 6,065…………. 6,188………… 2…
चेन्नई…….. 3,180…………. 4,468………. 41…
हैदराबाद… 6,487…………. 7,721………. 19…
कोलकता… 2,518…………. 3,382………. 34…
मुंबई……… 18,331……….. 18.574………. 1…
पुणे……….. 11,548……….. 13,725…….. 19…
एकूण…….. 58,914……….. 66,176…….. 12…
स्रोत- प्रॉपटायगर डॉट कॉम