वृत्तसंस्था/ व्हॅलेडीबेबास
ला लीगा फुटबॉल स्पर्धेतील शनिवारी येथे झालेल्या थरारक फुटबॉल सामन्यात रियल माद्रीदने बलाढय़ बार्सिलोनाचा 2-1 अशा गोलफरकाने पराभव करत स्पर्धेच्या गुणतक्त्यात आघाडीचे स्थान मिळविले आहे.
हा सामना शेवटच्या क्षणापर्यंत अटीतटीचा झाला. सामन्याच्या पूर्वार्धात करीम बेंझेमाने रियल माद्रीदचे खाते उघडले. बार्सिलोनातर्फे ऑसकर मिनगेझने गोल नोंदवून आपल्या संघाला बरोबरीत नेले. रियल माद्रीदचा दुसरा आणि निर्णायक गोल टोनी क्रूसने फ्री कीकवर नोंदविला. या विजयामुळे रियल माद्रीदने स्पर्धेच्या गुणतक्त्यात ऍटलेटिकोसमवेत संयुक्त अघाडी मिळविली आहे.