बेळगाव : रिलायन्स डिजिटलने दिलेल्या दिवाळी ऑफर्समुळे दिवाळी उत्सव हंगाम अधिक उजळ झाला आहे. सर्व रिलायन्स डिजिटल स्टोअर्स, माय जिओ स्टोअर्स आणि www.reliancedigital.in वर तुमच्या आवडत्या गॅजेट्स आणि उपकरणांवरील आकर्षक डिल्स आणि डिस्काऊंट्सचा लाभ घ्या. इलेक्ट्रॉनिक्सवरील सर्वोत्तम डिल्स व्यतिरिक्त ऍक्सिस बँक, सिटीबँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि कोटक महिंद्रा बँकेच्या क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि ईएमआयचा वापर करून केलेल्या खरेदीवर 10 टक्के इन्स्टंट डिस्काऊंट देण्यात येणार आहे (ही ऑफर 7 नोव्हेंबर 2021 पर्यंत आहे). त्याचप्रमाणे टीव्ही, स्मार्टफोन, लॅपटॉप्स, रेफ्रिजरेटर्स, वॉशिंग मशीन्स, वेअरबेल्स आणि गृहोपयोगी उपकरणांवर खास ऑफर उपलब्ध आहेत.
स्मार्ट फोनसाठी निवडक मॉडेल्सवर खास ऑफर्स तसेच विशेष लाभ उपलब्ध करून देण्यात आले आहेत. नवा सॅमसंग एस 21 रु. 61,999 या किमतीपासून उपलब्ध आहे. वनप्लस नॉर्ड 2 हा फोन रु. 29,999 या किमतीपासून उपलब्ध आहे आणि यासोबत अतिरिक्त लाभही देण्यात येत आहेत.
सॅमसंग, नॉईस, फायरबोल्ट, फिटबिट, अमेझफिट यासारख्या टॉप ब्रँड्सच्या एसपीओ 2 युक्त टॉप ब्रँड्सच्या वेअरबेल्सवर आकर्षक ऑफर्स उपलब्ध असून ही उपकरणे रु. 1999 पासून उपलब्ध आहेत. या खरेदीवरही अतिरिक्त लाभ देऊ करण्यात आले आहेत.
Nvidia GTX 165TI ची पॉवर लाभलेले हाय परफॉरमन्स लॅपटॉप्स दरमहा फक्त 4,999 मध्ये उपलब्ध आहेत. विंडोज 11 असलेले लॅपटॉप्स फक्त रु. 56,999 या किमतीपासून उपलब्ध आहेत आणि त्यांचा ईएमआय रु. 4749 इतक्या कमी रकमेपासून सुरू होतो. त्याचप्रमाणे तुमच्या खरेदीवर रु. 11,900 पर्यंतचे लाभ मिळवू शकता.
सॅमसंग निओ QLED टीव्ही 3 वर्षांच्या वॉरंटीसह खरेदी करा आणि 20 टक्केपर्यंत कॅशबॅक व रु. 37,400 मूल्याचा साऊंडबार मोफत मिळवा. एलजी ओएलईडी स्मार्ट टीव्हींची श्रेणी 3 वर्षांची वॉरंटी आणि 20 टक्केपर्यंत कॅशबॅकसह उपलब्ध आहे. डायरेक्ट कूल रेफ्रिजरेटर्स रु. 12,490 या किमतीत उपलब्ध असून त्यासोबत रु. 1595 मूल्यापर्यंतच्या मोफत भेटवस्तू मिळणार आहेत. टॉप ब्रँड्सचे प्रिमिअम साईड बाय साईड रेफ्रिजरेटर्स फक्त 59,990 पासून उपलब्ध आहेत.