नवी दिल्ली
रिलॅक्सो फुटवियर्स लिमिटेडला 31 मार्च 2021 ला संपलेल्या चौथ्या तिमाहीत 102 कोटींचा निव्वळ नफा झाला आहे. हा नफा मागच्या वर्षाच्या समान कालावधीच्या तुलनेत 97 टक्के अधिक नोंदला गेला आहे. मागच्या वर्षी समान कालावधीत कंपनीचा निव्वळ नफा 51.80 कोटी रुपये इतका होता. कंपनीच्या उत्पन्नामध्ये 38 टक्के इतकी वाढ झाली असल्याची माहिती रिलॅक्सो फुटवियर्सने शेअर बाजाराला दिली आहे. कंपनीचे उत्पन्न वाढून 747.68 कोटी रुपयांवर पोहचले आहे. मागच्या वर्षी समान कालावधीत ते 549.58 कोटी रुपये इतके होते.