प्रतिनिधी /बेळगाव
खास लोकाग्रहास्तव हॉटेल सन्मान येथे भरलेल्या रुद्राक्ष प्रदर्शनाचा कालावधी वाढविण्यात आला आहे. हे प्रदर्शन रविवारपर्यंत खुले असणार आहे. रुद्राक्षाला आरोग्याच्यादृष्टीने विशेष महत्व असून रुद्राक्ष धारण केल्याने रोगावर नियंत्रण मिळविता येते, असे सप्रमाण सिद्ध झाले आहे.
रुद्राक्ष घातल्याने शरीरातील चैतन्य लहरी अधिक कार्यक्षम होतात. याशिवाय एकमुखी, दोनमुखी ते 21 मुखी रुद्राक्ष असून प्रत्येक रुद्राक्षाचे आरोग्याच्यादृष्टीने वेगवेगळे महत्व आहे. त्यामुळे लोकांचा रुद्राक्ष खरेदी करण्याकडे अधिक कल आहे. बेळगावमध्ये दरवषी रुद्राक्ष प्रदर्शनाला उत्तम प्रतिसाद लाभतो. यंदा लोकांचा प्रतिसाद अधिक असून त्यांच्या आग्रहास्तव प्रदर्शनाची मुदत वाढविण्यात आल्याचे नरेंद्र काशीरेड्डी यांनी सांगितले.