नटीचं लग्न हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. त्यात सध्या सेलिब्रिटी कलाकार लग्न करण्याआधी त्याचा खूपच गाजावाजा करतात. सोशलमीडियावर कधी अंगठीचे तर कधी होणाऱया जोडीदारासोबत पाठमोऱया पोझमधले फोटो शेअर करत असतात. प्रेमातपडून दोन ते तीन वर्षे एकमेकांना डेट करायचं, सोबत भटकंती करायची, त्याचे फोटो, व्हिडिओ शेअर करायचे हा आता ट्रेंडच झाला आहे. सई लोकूर, सिद्धार्थ चांदेकर, मिताली मयेकर, अभिज्ञा भावे, शर्मिष्ठा राऊत यांच्या लग्न इतकेच त्यांच्या रिलेशनशीप आणि
लग्नाच्या तारखांच्या आणि शॉपिंगच्या पोस्ट गाजत होत्या. गेल्या काही दिवसांपासून शांत असलेला हा ट्रेंड पुन्हा चर्चेत आणला तो अभिनेत्री रुपाली भोसले हिने. इन्स्टापेजवर मंगळसूत्राचा फोटो शेअर करत रुपालीने तयारी झाली सुरू अशी कॅप्शन दिली होती. ही पोस्ट पाहून कमेंटची दिशा रुपालीच्या लग्नापर्यंत गेल्याने रुपालीनेच तिच्या लग्नाचा फुगा फोडला आणि त्या पोस्टचं खरं कारण सांगून टाकलं. हे मंगळसूत्र माझ्यासाठी नाही तर भाऊ संकेतच्या बायकोसाठी खरेदी केलं आहे. मला लग्न करायला अजून बराच वेळ आहे असं सांगत रुपालीने तिच्या लग्नाची चर्चा थांबवली असली तरी या निमित्ताने लाइमलाइटमध्ये येण्याची संधी साधून घेतली. बिग बॉस या शोमुळे एकदम प्रसिद्धीच्या झोतात आलेली रुपाली भोसले सध्या आई कुठे काय करते या मालिकेत संजना ही भूमिका साकारत आहे. रुपालीने संजना ही खलनायिका तिच्या अभिनयाने चांगलीच लोकप्रिय केली आहे. खरंतर रुपालीची ही सेकंड इनिंग आहे. शिवाय आता रुपालीच्या आयुष्यातील प्रॉब्लेम्स मिटल्याने तिने लग्नाची तयारी सुरू केली असणार असे तिच्या चाहत्यांना वाटले.
Previous Articleसाताऱयात आदेश मोडणाऱया 21 जणांवर कारवाई
Next Article शांघायमधून रवाना होणार ‘वंडर ऑफ द सीज’
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.