प्रतिनिधी / बेळगाव
हैदराबाद येथील इंडस-नेपाळ रूद्राक्ष संस्थेतर्फे हॉटेल सन्मान येथे 15 मार्च पर्यंत रूद्राक्ष प्रदर्शन व विक्रीचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाला बेळगावच्या नागरिकांकडून उत्तम असा प्रतिसाद मिळू लागला आहे. महाशिवरात्रीच्या पार्श्वभुमिवर रूद्राक्षांची खरेदी वाडल्याचे संस्थेचे संचालक नरेंद्र काशीरेड्डी यांनी सांगितले.
या प्रदर्शनात एकमुखी पासुन 21 मुखीपर्यंत रूद्राक्ष विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. वेद गणित शास्त्राचा वापर करून जन्म तारखेप्रमाणे रूद्राक्ष देण्यात येते. महाशिवरात्रीच्या शुभ मुहुर्तावर रूद्राक्ष खरेदी केल्यास ते शुभ मानले जाते. या प्रदर्शनात सोन्याचे कवच असलेले रूद्राक्षही उपलब्ध आहे. 100 रूपयांपासून दीड लाखापर्यंत रूद्राक्ष या प्रदर्शनात मांडण्यात आले आहेत. प्रदर्शनात विक्री झालेले रूद्राक्ष नकली असल्याचे सिद्ध झाल्यास विकत घेतलेल्या रक्कमेच्या दोनपट रक्कम वापस दिली जाणार असल्याचे काशी रेड्डी यांनी सांगितले. स्फटीक, तुळशी माळ, शाळीग्राम यासह विविध धार्मिक साहित्यही या ठिकाणी उपलब्ध आहे. त्यामुळे प्रदर्शनाला भेट देणाऱया व रूद्राक्ष खरेदी करणाऱयांची संख्या वाढल्याचे आयोजकांनी सांगितले.