वृत्तसंस्था/ मेलबर्न
कॅनडाच्या मिलोस रेऑनिकने पुढील महिन्यात होणाऱया ऑस्ट्रेलिया ओपन स्पर्धेतून माघार घेतली आहे. टाचेला झालेल्या दुखापतीमुळे त्याने हा निर्णय घेतला आहे.
गेल्या मार्चमध्ये त्याला मांडीची दुखापत झाली होती. त्यातून बरा झाल्यावर तीन महिन्यांनी त्याने पुनरागमन केले होते. गेल्या जुलैमध्ये ऍटलांटा ओपनमध्ये पहिल्याच फेरीत पराभूत झाल्यानंतर त्याच्या टाचेला झालेल्या दुखापतीमुळे या मोसमात त्याला फारसे खेळता आले नव्हते. 2016 मध्ये त्याने जागतिक एटीपी क्रमवारीत सर्वोच्च तिसऱया स्थानापर्यंत झेप घेतली होती. त्याच वर्षी त्याने विम्बल्डनची अंतिम फेरी गाठली होती तर मेलबर्नमध्ये उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. त्याची सध्या 70 व्या स्थानापर्यंत घसरण झाली असून ऑस्ट्रेलियन स्पर्धेतून माघार घेतलेल्या फेडरर, वावरिंका, जेनिफर ब्रॅडी, कॅरोलिना प्लिस्कोव्हा, कॅरोलिना मुचोव्हा, सेरेना विल्यम्स, बियान्का अँड्रीस्क्यू या खेळाडूंत त्याचीही भर पडली आहे.