प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोनाच्या काळातही अहोरात्र मेहनत करून 24 तास वीजपुरवठा सुरळीत ठेवणाऱया विद्युत कर्मचाऱयांचा कोरोना योद्धा म्हणून मास्कचे वाटप करण्यात आले. इंडियन रेडक्रॉस सोसायटी व उन्नती एज्युकेशन ऍण्ड रूरल डेव्हल्पमेंट संस्थेच्यावतीने शुक्रवारी रेल्वेस्टेशन येथील हेस्कॉम उपविभागीय कार्यालयात मास्क व एनर्जी डिंकचे वाटप करण्यात आले. 200 हेस्कॉम कर्मचाऱयांना मास्कचे वाटप करण्यात आले.
प्रारंभी साहाय्यक कार्यकारी अभियंते अरविंद गदगकर यांनी प्रास्ताविक केले. साहाय्यक कार्यकारी अभियंते विनोद करूर यांनी स्वागत केले. यावेळी बोलताना रेडक्रॉस सोसायटीचे अध्यक्ष अशोक बदामी म्हणाले, लॉकडाऊनच्या काळातही 24 तास सुरळीत वीजपुरवठा केल्याने विद्युत कर्मचारीही कोरोना योद्धे आहेत. कोरोनाच्या उपचारावेळी रक्ताची गरज लागत आहे. त्यामुळे प्रत्येकाने रक्तदान करावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी सेपेटरी डॉ. डी. एन. मिसाळे, उन्नती एज्युकेशन ऍण्ड रूरल डेव्हल्पमेंट सोसायटीच्या अध्यक्षा प्रिया पुराणिक, कर्नल विनोदिनी शर्मा, ज्युनिअर इंजिनिअर पी. एन. बेळीकट्टी, नागराज पाटील यांसह हेस्कॉमचे कर्मचारी उपस्थित होते.
केईबी इंजिनिअर असोसिएशनतर्फे रक्तदान शिबिर
केपीटीसीएल व हेस्कॉम इंजिनिअर असोसिएशनतर्फे गुरुवारी नेहरुनगर येथील कार्यालयात शिबिराचे आयोजन केले होते. केएलई हॉस्पिटल व रेडक्रॉस सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. एकूण 52 अधिकाऱयांनी यामध्ये रक्तदान केले. यावेळी रेडक्रॉस सोसायटीचे सदस्य उपस्थित होते.