मुंबईः
शाओमी कंपनीचा नवा रेडमी नोट प्रो मॅक्सच्या विक्रीचा 24 जूनपासून शुभारंभ करण्यात आला आहे. या फोनच्या किमतीत मध्यंतरी वारंवार बदल करण्यात आला होता. आताची किमत 16999 रुपये इतकी असणार असून एमआय इंडिया संकेतस्थळ व ऍमेझॉन इंडिया पोर्टलवर हा फोन खरेदी करता येईल. 6 जी बी व 64 जी बी, 6 जी बी व 128 जी बी, तसेच 8 जीबी व 128 जी बी स्टोरेज प्रकारात सादर केलेल्या फोन्सची किंमत अनुक्रमे 16 हजार 999, 18 हजार 499 रु. आणि 19999 रुपये असणार आहे. लॉचिंग ऑफरखाली हे फोन 2 हजार रुपये सवलतीत मिळणार आहेत