अन्नपूर्णेश्वरी मंदिर ट्रस्टच्यावतीने सत्कार
प्रतिनिधी /बेळगाव
सौंदत्ती येथील रेणुका देवी मंदिर ट्रस्टच्या संचालकपदी सरकारने सुनील पुजारी यांची निवड केली आहे. याबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे. या ट्रस्टवर सरकार नियुक्त एक संचालक असतो. बेळगावमधून पहिल्यांदाच ही निवड या मंदिरच्या ट्रस्टवर झाली आहे. याबद्दल अन्नपूर्णेश्वरी मंदिर ट्रस्टच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रविराज हेगडे होते. प्रारंभी श्रवण हेगडे यांनी सुनील पुजारी यांचे कार्य सांगितले. सरकारने त्याची दखल घेऊन नियुक्ती केली त्याबद्दल त्यांनी सरकारचे आभार मानले. यावेळी अन्नपूर्णेश्वरी मंदिर ट्रस्टच्यावतीने शाल, श्रीफळ देऊन सुनील पुजारी यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी किरण सावंत, अमित सावंत, भरत धामणेकर, सतीश शिवाजी पाटील, सचिन मधाळे, सचिन घोरपडे, आनंद घोरपडे, मंजुनाथ कोठीवाले, शाम तुळजाई, प्रसाद म्हार्दोळकर, वीरेंद्र हेगडे यांच्यासह नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक शिंदोळकर यांनी केले. उमेश पाटील यांनी आभार मानले.