मुंबई
सरकारी क्षेत्रातील कंपनी रेलटेल लवकरच आपला आयपीओ सादर करणार आहे. या आयपीओतून कंपनी 700 कोटी रुपये जमवणार असल्याचे सांगण्यात येते. आयपीओ सादर करण्यासाठी लागणारी आवश्यक ती परवानगी बाजारातील नियामक सेबीने रेलटेलला देऊ केली आहे. यात पेंद्र सरकार 8.66 कोटी समभाग विक्री करणार असल्याचे सांगण्यात येते. ही एक मिनीरत्न सरकारी कंपनी असून देशभरात रेल्वे ट्रकसोबत ऑप्टीकल फायबरचे जाळे तयार करणे व दूरध्वनी पायाभूत सुविधा देण्याचे कार्य करते.