सर्वोच्च न्यायालयाची रेल्वेला सूचना :… तर रेल्वेकडून कायदेशीर कारवाईचा इशारा
प्रतिनिधी /बेळगाव
तुम्ही रेल्वेतून प्रवास करत असाल आणि मोबाईलवर मोठय़ाने गाणी लावून ऐकत असाल तर यापुढे तुमच्यावर रेल्वेकडून कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. प्रवासादरम्यान प्रत्येकाची मनस्थिती ही वेगवेगळी असते. त्यामुळे मोठय़ाने गाणी लावून अथवा मोठय़ाने फोनवर बोलल्यास इतरांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने भारतीय रेल्वेला सूचना करत यावर कठोर निर्बंध आणावेत, असे स्पष्ट केले आहे.
कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एन. रमेश, न्यायमूर्ती ऋतुराज अवस्थी व एस. आर. कुलकर्णी यांच्या खंडपीठाने जनहित याचिका दाखल केली होती. रेल्वे, परिवहन महामंडळाच्या बस व सीटी बसमध्ये मोठय़ाने गाणी ऐकण्यास बंदी घालावी, अशी याचिका दाखल केली होती. या याचिकेमुळे बसमध्ये प्रवासादरम्यान मोठय़ाने गाणी ऐकण्यावर बंदी आणली. परंतु अद्याप रेल्वेमध्ये हे प्रकार सुरूच आहेत. याचा प्रवाशांना मनस्ताप होत असून यावर निर्बंध घालण्यास सांगण्यात आले आहे.
प्रवासादरम्यान वेळ असल्याने मोबाईलवर मोठय़ाने गाणी ऐकणे, चित्रपट पहाणे, एखाद्या व्यक्तीला फोन करून मोठय़ाने बोलणे, असे प्रकार सर्रास होतात. प्रत्येक प्रवाशाला याचा केक्हा ना केव्हा अनुभव येतोच. यापूर्वी बसमध्ये असे प्रकार घडत होते. ज्याची गाणी ऐकण्याची मानसिकता नाही, अशा प्रवाशांसोबत वादावादीचे प्रकारही घडले आहेत. त्यामुळे यावर कठोर निर्बंध येणे गरजेचे आहे. हेडफोनविना मोठय़ाने गाणी ऐकणाऱयांची तक्रार रेल्वेकडे करावी लागणार आहे.
अशी आहे कायद्यात तरतूद
कर्नाटक मोटरवाहन अधिनियम 1989 (94 नियमानुसार) (1) (ए), भारतीय रेल्वे कायदा कलम 145 (बी) अन्वये याबाबत तरतूद केली आहे. रेल्वे, बसमधून प्रवास करताना मोठय़ाने बोलणे तसेच गाणी ऐकण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. परंतु या नियमावलीची अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येत आहे.
अशी आहे रेल्वेची नियमावली-
- प्रवासी फोनवर मोठय़ाने गाणी ऐकणार नाहीत अथवा बोलणार नाहीत.
- तिकीट तपासनीस, रेल्वे कर्मचारी याबाबत प्रवाशांना सल्ला देतील.
- रात्री 10 नंतर रेल्वेमधील रात्रीची लाईट वगळता इतर सर्व लाईट बंद करावेत.
- रात्री उशिरापर्यंत गप्पा मारण्याची परवानगी दिली जाणार नाही.